• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला ट्रॉफी जिंकणे कठीण? एलिमिनेटर फेरीत खेळलेल्या संघाचा असा आहे इतिहास

May 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून सात संघ आऊट झाले आहेत. आता गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यापैकी एका संघाचा प्रवास थांबणार आहे. दोन्ही संघ क्वॉलिफायर 2 मध्ये भिडणार आहे. यापैकी विजयी संघ अंतिम फेरी गाठेल, तर पराभूत झालेल्या संघाचा प्रवास थांबेल. क्वॉलिफायर 2 सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर 31 मे रोजी अंतिम सामना असेल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी विजयी संघाची लढत होईल. राजस्थान रॉयल्सने या स्पर्धेत चांगली कमगिरी केली आहे. जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक मानला जात आहे. राजस्थान रॉयल्सने क्वॉलिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्सला पराभूत करून अंतिम फेरी गाठली तर जेतेपदाचा मार्ग वाटतो तितका सोपा नाही. आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात असंच घडलं आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात फक्त एकदाच एलिमिनेटर सामना खेळलेल्या संघाने जेतेपद पटकावलं आहे. सनरायझर्स हैदराबादने ही किमया साधली होती. 2016 मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने हा विजय मिळवला होता. तेव्हा एलिमिनेटर फेरीत केकेआरला 22 धावांनी नमवलं होतं. त्यानंतर क्वॉलिफायर 2 मद्ये गुजरात लायन्सला 4 विकेटने पराभूत केलं. त्यानंतर अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभवाची धूळ चारत जेतेपद पटकावलं होतं. आता राजस्थान रॉयल्स 2016 कित्ता गिरवणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. कारण बाद फेरीतील दोन सामने जिंकून अंतिम फेरीत विजय मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही.

राजस्थान रॉयल्सचा आयपीएल इतिहास

राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिलं जेतेपद पटकावलं होतं. शेन वॉर्नच्या नेतृत्वात जेतेपदाला गवसणी घातली होती. चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करून स्पर्धेतील पहिला चॅम्पियन ठरला होता. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने थेट 2022 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. तेव्हा गुजरात टायटन्सने पराभूत केलं होतं. तसेच दुसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं. आता यंदाच्या पर्वात अंतिम फेरी गाठणार का? हा प्रश्न आहे. एलिमिनेटर फेरीत सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून क्वॉलिफायर 2 मध्ये एन्ट्री मारली आहे. त्यामुळे पहिल्यांदा गुजरात टायटन्सला पराभूत करण्याचं आव्हान आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in