• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: एक योगायोग आणि आयपीएल जेतेपदासाठी राजस्थान रॉयल्सच्या नावाची चर्चा! कसं काय ते जाणून घ्या

April 15, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा प्लेऑफचा प्रवास सध्या तरी सोपा दिसत आहे. आता उर्वरित 9 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफचं तिकीट मिळेल. असं असताना राजस्थान रॉयल्स जेतेपद मिळवेल असं काही क्रीडाप्रेमी सोशल मीडियावर चर्चा करत आहेत. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. साखळी फेरीचे सामने सुरू असताना आधीच कसं काही भाकीत वर्तवलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण हा एक योग असून त्या आधारावर राजस्थानचे चाहते अंदाज बांधत आहेत. 18 वर्षांपूर्वी राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं. तसंच काहीसं आता घडताना दिसत आहे. चला जाणून घेऊयात तेव्हा आणि आता काय घडलं आणि काय साम्य आहे ते…

राजस्थान रॉयल्सचा पराभव आणि…

राजस्थान रॉयल्सने या स्पर्धेच्या सुरूवातीच्या चार सामन्यात विजयी चौकार मारला. पण पाचव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. 2008मध्ये पहिल्या पाच सामन्यात असंच झालं होतं. तेव्हा शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने पहिल्या पाच सामन्यातील चार सामने जिंकले होते. तर एका सामन्यात पराभव झाला होता. आता पु्न्हा तसंच घडलं आहे आणि राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांना जेतेपदाची चर्चा करण्यासाठी निमित्त मिळालं आहे. त्यामुळे आता राजस्थान रॉयल्सचा पुढचा प्रवास कसा असेल याकडे लक्ष लागून आहे. मागच्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सने अशीच सुरूवात केली होती आणि नंतर प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यात अपयशी ठरले. त्यामुळे पुढच्या चार सामन्यात राजस्थानची स्थिती काय ते कळून येईल.

राजस्थान रॉयल्सची कामगिरी

राजस्थान रॉयल्सने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला 8 विकेटने, दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सला 6 धावांनी, मुंबई इंडियन्सला 27 धावांनी आणि आरसीबीला 6 विकेट राखून पराभूत केलं. तर सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा साना 57 धावांनी गमावला. आता राजस्थान रॉयल्सचा पुढचा सामना 19 एप्रिलला कोलकात्याशी होणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL : वेगवान 50 विकेट्स घेणारे टॉप 5 फिरकीपटू, भारताच्या दोघांचा समावेश, नंबर 1 कोण?
  • Nashik IT Company | नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन, मोठं रॅकेट उघड
  • महेंद्रसिंह धोनीने कोलकात्याविरुद्धच्या विजयात दिलं योगदान, सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा
  • घरातील ‘कर्ता’ कुटुंबाची संमती न घेता HUF प्रॉपर्टी विकू शकतो का? जाणून घ्या कायदेशीर नियम
  • सम्राट चौधरी की नीतीश कुमार? कोण आहे जास्त श्रीमंत? बिहारच्या नवीन मुख्यमंत्र्यांची संपत्ती वाचून व्हाल थक्क!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in