• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महेंद्रसिंह धोनीने कोलकात्याविरुद्धच्या विजयात दिलं योगदान, सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा

April 15, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी निराशाजनक झाली. पहिल्या तीन सामन्यात सलग पराभवाला सामोरं जावं लागलं. असं असताना चेन्नई सुपर किंग्सने मागच्या दोन सामन्यात चांगली कामगिरी केली. मागच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करून चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत सुधारणा केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीचं योगदान मोलाचं ठरलं. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी मैदानात उतरला नाही. पण त्याचं मार्गदर्शन कामी आलं. या स्पर्धेतील सुरूवातीच्या सामन्यात फिरकीपटू नूर अहमदचा फॉर्म गेला होता. पण त्याला फॉर्म परत मिळवून देण्यात धोनीचं योगदान महत्त्वाचं ठरलं. चेन्नई सुपर किंग्सचे प्रशिक्षकांनी याबाबतचा खुलासा केला आहे. चेन्नई सुपर किंग्सनचे प्रशिक्षक श्रीराम यांनी कसं काय ते सांगितलं.

चेन्नई सुपर किंग्सचे गोलंदाज प्रशिक्षक श्रीराम यांनी सांगितलं की, ‘कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात खेळपट्टी उत्कृष्ट होती. नूरने चेंडू हवेत खूप संथ ठेवला. त्याचा चेंडू खेळपट्टीवर फिरत होता. सामन्यापूर्वी धोनीने त्याच्याशी बोलून त्याला चेंडू हवेत संथ ठेवण्यास सांगितले होते. त्याचे आणि धोनीचे बरेच संभाषण झाले होते. यामुळे नूरचा लेग ब्रेक परत आला आणि मला वाटते की याचा त्याला खूप फायदा झाला.” नूरने कोलकात्याविरुद्धच्या साम्न्यात चार षटकात 21 धावा देत तीन गडी बाद केले. केकेआरची मधली फळी उद्ध्वस्त करण्यात त्याचं योगदान मोलाचं राहिलं. मधल्या फळीतील विकेट मिळाल्याने 192 धावांचा पाठलाग करणं केकेआरला कठीण गेलं.

महेंद्रसिंह धोनी दुखापतीमुळे स्पर्धा सुरू झाल्यापासून एकही सामना खेळला नाही. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात खेळेल असं बोललं जात होतं. पण या सामन्यातही मैदानात दिसला नाही. पण मैदानापासून दूर राहूनही त्याने संघाला मदत केली. आता पुढच्या सामन्यात धोनी मैदानात परतेल की नाही याबाबतही सस्पेन्स आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा पुढचा सामना 18 एप्रिलला होणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध असणार आहे. या सामन्यात गोलंदाजांचा कस लागणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आमची ओळख असल्यामुळेच…, अशोक खरात प्रकरणावर केसरकर स्पष्टच बोलले, अंधारेंच्या आरोपांना प्रत्युत्तर
  • आणखी एक भोंदूबाबा समोर, मंत्रांचा उच्चार करून… अहिल्यानगरमधील घटनेने खळबळ
  • आता फिनिक्ससारखं राखेतून उठण्याची वेळ, रविना टंडन, प्राजक्ता माळीने केलं नारीशक्ती वंदन अधिनियमाचे स्वागत!
  • Vinod Kambli : विनोद कांबळीच्या तब्येतीबाबत चिंताजनक अपडेट, क्रिकेटपटूसाठी माजी सहकारी एकवटले, काय झालंय?
  • जगात सर्वात जास्त तेल साठे असलेले 6 देश कोणते ? पहिल्या क्रमांकाचा देश वाचून आश्चर्य वाटेल…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in