• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आणखी एक भोंदूबाबा समोर, मंत्रांचा उच्चार करून… अहिल्यानगरमधील घटनेने खळबळ

April 15, 2026 by admin Leave a Comment


राज्यात सध्या अशोक खरातचे प्रकरण समोर आहे. खरातने नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात भोंदू गिरी करून नागरिकांना लुटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असताना आता अहिल्यानगरमधून आणखी एक भोंदू बाबा समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील दत्तधाममध्ये एक तथाकथित महाराज मंत्रांचा उच्चार करून शारीरिक आजार बरे करत असल्याचा दावा करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा बाबा भोंदू गिरीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मंत्रांच्या मदतीने आजार बरा करण्याचा दावा

संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील दत्तधाममध्ये एक भोंदू बाबा मंत्रांचा उच्चार करून आजार बरे करत असल्याचे समोर आले आहे. हा बाबा स्वतःला गडगे महाराज म्हणवतो, या व्यक्तीभोवती मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. या बाबाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

अनेक नागरिकांना लुटले

कोल्हेवाडी येथील दत्तधाममध्ये सुरू असलेल्या या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये भीती आणि संताप दोन्ही वाढताना दिसत आहेत. तथाकथित महाराज लोकांकडून 11 हजार, 21 हजार, अगदी 52 हजार रुपयांपर्यंत रक्कम घेत असल्याचा आरोप आहे. गावकऱ्यांच्या मते, हा व्यक्ती कोणताही आध्यात्मिक गुरु नसून मूळचा गवंडी असून सिमेंटच्या टाक्या बनवण्याचा व्यवसाय करतो. इतकंच नव्हे, तर त्याच्यावर दोन लग्न केल्याचेही आरोप करण्यात येत आहेत. तसेच आजूबाजूच्या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आल्यामुळे या ठिकाणी इतर बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांकडे कारवाईची मागणी

कोल्हेवाडीतील एका ग्रामस्थाने सांगितले की, दत्तधाममध्ये असलेला हा भोंदू महाराज आहे. त्याने अनेकांकडून 11 हजार, 21 हजार 52 हजार अशा पावत्या करून लोकांची फसवणूक केली आहे. माझ्या पाहुण्याचा ज्या दिवशी प्रॉब्लेम झाला तेव्हा हा बाबा पळून गेला. पोलीस प्रशासनाने या भोंदू बाबा वर कारवाई करावी, कारण त्याचा गोरख धंदा बंद झाला पाहिजे. भोंदू बाबाला पैसे देण्यासाठी एका महिलेला जोडवी विकावे लागली असल्याचीही माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सापाचं बीळ आहे की उंदराचं हे कसं ओळखायचं? दोन्हीमधील नेमका फरक काय? वाचा…
  • RCB vs LSG: आयपीएल स्पर्धेत 2017 नंतर भुवनेश्वर कुमारने केला असा कारनामा, डाव संपल्यानंतर म्हणाला..
  • Vinod Kambli : विनोद कांबळीला ब्रेनस्ट्रोकचा भयंकर धोका, धक्कादायक माहिती मिळताच सचिनसह सर्वच मित्र मदतीसाठी धावले
  • 16 April Horoscope : 4 राशींचं नशीब फळफळणार, चालून आला खूपच दुर्मिळ योग; वाचा काय घडणार?
  • 23000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी? TCS च्या एचआरने सांगितले सत्य, वाचा…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in