• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vinod Kambli : विनोद कांबळीच्या तब्येतीबाबत चिंताजनक अपडेट, क्रिकेटपटूसाठी माजी सहकारी एकवटले, काय झालंय?

April 15, 2026 by admin Leave a Comment


टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि सचिन तेंडुलकरचा जिगरी मित्र विनोद कांबळी याच्या तब्येतीबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. विनोद कांबळी गेल्या अनेक वर्षांपासून प्रकृतीसोबत झगडत आहेत. आपला मित्र बरा व्हावा यासाठी काही महिन्यांआधी माजी खेळाडूंनी एकत्र येत कांबळीच्या उपचारांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. तसेच राज्य सरकारनेही माजी क्रिकेटपटूला मदत केली होती. त्यानंतर कांबळीच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांबळीला गंभीर आजाराने ग्रासलं आहे. कांबळीला फार काही आठवत नसल्याचं म्हटलं जात आहे. कांबळीला औषध घेण्याची आठवण राहत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.

विनोद कांबळीला ब्रेन स्ट्रोकचा धोका!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनोद कांबळीला ब्रेन स्ट्रोकचा धोका असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे संभाव्य धोका पाहता कांबळीची क्रिकेटपटू मित्र पुन्हा एकदा एक्शन मोडमध्ये आले आहेत. कांबळीच्या मित्रांनी आणि क्रिकेटपटूंनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आवश्यक उपचारांसाठी आर्थिक मदत करता यावी या हेतूने व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये सचिन तेंडुलकर असल्याचंही म्हटलं जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सापाचं बीळ आहे की उंदराचं हे कसं ओळखायचं? दोन्हीमधील नेमका फरक काय? वाचा…
  • RCB vs LSG: आयपीएल स्पर्धेत 2017 नंतर भुवनेश्वर कुमारने केला असा कारनामा, डाव संपल्यानंतर म्हणाला..
  • Vinod Kambli : विनोद कांबळीला ब्रेनस्ट्रोकचा भयंकर धोका, धक्कादायक माहिती मिळताच सचिनसह सर्वच मित्र मदतीसाठी धावले
  • 16 April Horoscope : 4 राशींचं नशीब फळफळणार, चालून आला खूपच दुर्मिळ योग; वाचा काय घडणार?
  • 23000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी? TCS च्या एचआरने सांगितले सत्य, वाचा…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in