• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL : वेगवान 50 विकेट्स घेणारे टॉप 5 फिरकीपटू, भारताच्या दोघांचा समावेश, नंबर 1 कोण?

April 15, 2026 by admin Leave a Comment


अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू नूर अहमद आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सचं प्रतिनिधित्व करत आहे. नूरने मंगळवारी 14 एप्रिलला केकेआर विरुद्ध सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. नूर यासह आयपीएल स्पर्धेत वेगवान 50 विकेट्स मिळवणारा पाचवा फिरकीपटू ठरला. यानिमित्ताने आयपीएल स्पर्धेत वेगवान 50 विकेट्स मिळवणाऱ्या इतर 4 गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

Yuzvnedra Chahal RR IPL

आयपीएल स्पर्धेत वेगवान 50 विकेट्स घेणाऱ्या फिरकीपटूंच्या यादीत युझवेंद्र चहल चौथ्या स्थानी आहे. चहलने 40 सामन्यांमध्ये विकेट्सचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. चहल या स्पर्धेतील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी 1 आहे. (Photo Credit : PTI)

Amit Mishara IPL

माजी फिरकीपटू अमित मिश्रा तिसऱ्या स्थानी आहे. अमितने 37 सामन्यांमध्ये 50 विकेट्स मिळवल्या होत्या. अमितने आयपीएल कारकीर्दीत हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली होती. (Photo Credit : PTI)

Imran Tahir MS Dhoni Csk IPL

दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू इम्रान ताहीर याने अमित मिश्राच्या तुलनेत 2 सामन्यांआधी 50 विकेट्स मिळवल्या. इम्रानने 35 टी 20 सामन्यांमध्ये 50 विकेट्स मिळवल्या होत्या. (Photo Credit : IPL)

Sunil Narine KKR IPL

वेस्ट इंडिजचा माजी फिरकीपटू सुनील नारायण याच्या नावावर आयपीएल स्पर्धेत सर्वात वेगवान 50 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. सुनीलने 32 सामन्यांमध्ये 50 विकेट्स मिळवल्या होत्या. सुनील कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करत आहे. (Photo Credit : News 9)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आमची ओळख असल्यामुळेच…, अशोक खरात प्रकरणावर केसरकर स्पष्टच बोलले, अंधारेंच्या आरोपांना प्रत्युत्तर
  • आणखी एक भोंदूबाबा समोर, मंत्रांचा उच्चार करून… अहिल्यानगरमधील घटनेने खळबळ
  • आता फिनिक्ससारखं राखेतून उठण्याची वेळ, रविना टंडन, प्राजक्ता माळीने केलं नारीशक्ती वंदन अधिनियमाचे स्वागत!
  • Vinod Kambli : विनोद कांबळीच्या तब्येतीबाबत चिंताजनक अपडेट, क्रिकेटपटूसाठी माजी सहकारी एकवटले, काय झालंय?
  • जगात सर्वात जास्त तेल साठे असलेले 6 देश कोणते ? पहिल्या क्रमांकाचा देश वाचून आश्चर्य वाटेल…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in