• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : आरसीबीची Qualifier 1 मध्ये कामगिरी कशी? पाहा आकडे

May 25, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल स्पर्धेतील 19 वा मोसम शेवटच्या टप्प्यात आहे. प्लेऑफ फेरीतील पहिला सामना हा 26 मे रोजी होणार आहे. क्वालिफायर-1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमध्ये आयोजित करण्यात आला आहे. (Photo Credit : PTI)

Rcb Virat Kohli

क्वालिफायर-1 सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत पोहचतो. त्यामुळे दोन्ही संघांत हा सामना जिंकण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने आरसीबीची आतापर्यंत क्वालिफायर-1 सामन्यातील कामगिरी कशी राहिली आहे हे जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

Defending Champions RCB Ipl

आरसीबीची क्वालिफायर-1 मॅच खेळण्याची ही चौथी वेळ असणार आहे.आरसीबीने याआधी खेळलेल्या 3 पैकी 2 क्वालिफायर-1 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर आरसीबीला एकदा पराभूत व्हावं लागलं आहे. (Photo Credit : PTI)

Virat Kohli Rcb

आरसीबीने 2011 साली पहिल्यांदा क्वालिफायर-1 सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळला होता. आरसीबीला या सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर आरसीबीने 2016 साली गुजरात लायन्स आणि 2025 मध्ये पंजाब किंग्सला पराभूत केलं होतं. (Photo Credit : PTI)

Gujarat Titans Shubman Gill

तसेच गुजरात टायटन्सने 2 वेळा क्वालिफायर-1 सामना खेळला आहे. गुजरातने या पैकी एकदा विजय मिळवून थेट फायनलमध्ये धडक दिली आहे. गुजरातने पहिल्यांदाच 2022 साली राजस्थान रॉयल्सला पराभूत करुन अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं होतं. तर गुजरातला 2023 साली चेन्नई विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. (Photo Credit : PTI)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in