
आयपीएल 2026 स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. या सामन्यात कोलकात्याने बाजी मारली. पण या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा डाव सुरू असताना धडाधड विकेट पडत होत्या. त्यात अंगकृष रघुवंशीच्या विकेटमुळे चर्चांना उधाण आलं. कारण त्याची विकेट सहज पडली नाही. तर क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याने त्याला बाद घोषित करण्यात आलं. अशा पद्धतीने बाद दिल्याने अंगकृष रघुवंशीचा संताप झाला. त्याने मैदानाबाहेर येताच बॅट आणि हेल्मेट फेकून दिलं. त्याची हीच कृती त्याला महागात पडली. कारण आयपीएस स्पर्धेचं आचारसंहितेचं उल्लंघन मानलं गेलं आहे. त्यासाठी आयपीएल व्यवस्थापनाने त्याला दंड ठोठावला आहे. त्याच्या सामना मानधनातून 20 टक्के रक्कम कापली आहे. तर त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही दिला गेला आहे.
अंगकृष रघुवंशीने आचारसंहितेच्या लेव्हल 1चं उल्लंघन केलं. आयपीएलने आपल्या निवेदनात स्पष्ट केलं की, ‘अंगकृष रघुवंशीने कलम 2.2 नियमांचं उल्लंघन केलं आहे. हे सामन्यादरम्यान क्रिकेटचं सामान किंवा कपडे, मैदानातील उपकरणं किंवा फिक्चर आणि फिटिंगचा चुकीचा वापर करण्यासंदर्भात आहे.’ याबाबत पुढे लिहिलं की, ‘ही घटना पाचव्या षटकात झाली जेव्हा क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण केल्याने त्याला बाद घोषित केलं गेलं. त्यानंतर अंगकृष रघुवंशीने रागाने आपली बॅट बाउंड्रीच्या कुशनवर मारली आणि त्यानंतर हेल्मेट डगआऊटमध्ये फेकलं.’
News
Angkrish Raghuvanshi of @KKRiders was fined 20% of his match fees and has also accumulated One Demerit Point (Level 1) for breaching Article 2.2 of the IPL’s Code of Conduct for Players and Team Officials.
More Details
| #TATAIPL | #LSGvKKR…
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2026
अंगकृष रघुवंशीने आपली चूक मान्य केली आणि सामनाधिकाऱ्यांनी सुनावलेली शिक्षेचा स्वीकार केला आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात अंगकृष रघुवंशी हा 8 चेंडूंमध्ये 9 धावांवर असताना क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याने बाद दिला गेला. आयपीएल 2026 दरम्यान कर्णधारांना वगळून दंड ठोठावण्यात आलेला अंगकृश रघुवंशी हा पाचवा खेळाडू आहे. नितीश राणा, टिम डेव्हिड, अभिषेक शर्मा आणि नांद्रे बर्गर यांनाही दंड ठोठावण्यात आला आहे.
News
|
Leave a Reply