
देशासह राज्यात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. अनेक शहराचं तापमान हे 42 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलं आहे. वाढत्या तापमानाचा नागरिकांना मोठा फटका बसत आहे. जाणून घेऊयात देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या दहा शहरांबद्दल.
देशात सर्वाधिक तापमान असलेल्या दहा शहरांमध्ये पहिल्या दोन स्थानावर महाराष्ट्रामधील शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अकोला आणि अमरावती शहरात 45.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोदं झाली आहे. या शहरातील तापमानाने यापूर्वेचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.
देशात सर्वाधिक तापमान असलेल्या टॉप टेन शहरांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील वर्धा शहर आहे. वर्ध्यामध्ये 45.5 अंश सेल्सिअस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. तर चौथ्या क्रमाकांवर पंजाब राज्यातील फरीदकोट हे शहर असून इथे 45.2 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.
पाचव्या नंबरवर हरियाणा राज्यातील रोहतक शहर असून, या शहरात उन्हाचा पारा 44.6 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सहाव्या क्रमाकांवर ओडिशा राज्यातील झारसुगुडा शहर असून येथे 44.6 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोदं झाली आहे.
तर सातव्या क्रमाकांवर गुजरातमधील सुरेंद्रनगर हे शहर आहे. या शहरामध्ये 43.8 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. आठव्या क्रमाकांवर अहमदाबाद शहर असून इथे 43.8 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. तर नवव्या स्थानावर नागपूर शहर असून दहावा क्रमांक मध्य प्रदेशमधील इंदोर या शहराचा आहे. इंदोरमध्ये 42.2 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.




Leave a Reply