• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

INDW vs PAKW : बर्मिंगहॅममध्ये महिला ब्रिगेड सरस, भारताची पाकिस्तान विरुद्ध आकडेवारी कशी? जाणून घ्या

June 12, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला आजपासून (12 जून) सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील 10 व्या पर्वात पहिल्यांदाच एकूण 12 संघांमध्ये वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी चुरस असणार आहे. स्पर्धेतील सहभागी 12 संघांना 6-6 प्रमाणे 2 गटात विभागण्यात आलं आहे. सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंड विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत. मात्र क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे रविवारी 14 जून रोजी होणाऱ्या सामन्याकडे लागून राहिलं आहे. रविवारी स्पर्धेत महामुकाबला होणार आहे. या सामन्यात कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले 2 शेजारी देश भारत-पाकिस्तान 2 हात करणार आहेत. हा सामना बर्मिंगहॅममध्ये आयोजित करण्यात आला आहे. मेन्ससह वुमन्स टीम इंडियाने या बर्मिंगहॅममध्ये पाकिस्तान विरुद्ध अप्रतिम कामगिरी केली आहे. या निमित्ताने पुरुष आणि महिला भारतीय संघाची या मैदानातील पाकिस्तान विरुद्धची आकडेवारी जाणून घेऊयात.

भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात एकमेकांविरूद्धच्या सामन्याने करणार आहेत. बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये सामना होणार आहे. बर्मिंगहॅममध्ये मोठ्या प्रमाणात भारत, पाकिस्तानसह आशियाई देशातील नागिरक कामानिमित्ताने तिथे राहतात. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याला हे क्रिकेट चाहते मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पैसावसूल सामना पाहायला मिळेल अशी आशा असणार आहे.

टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ

वुमन्स टीम इंडियाची बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये विजयी आकडेवारी अप्रतिम आहे. भारताने पाकिस्तान विरुद्ध या मैदानात खेळलेला एकमेव सामना जिंकला आहे. तसेच भारताने या मैदानात एकूण 6 टी 20I सामने खेळले आहेत. भारताने त्यापैकी 3 सामने जिंकले आहेत. तर भारताला 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं आहे. तर पाकिस्तानने या मैदानात खेळलेले तिन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे आकडेवारी पाहता टीम इंडिया या मैदानात पाकिस्तानवर मात करत वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात विजयाने करेल, असा विश्वास चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार 14 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. उभयसंघातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in