• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

INDW vs PAKW : टीम इंडियाच्या विजयाचे 5 शिल्पकार, POTM कोण?

June 14, 2026 by admin Leave a Comment

भारतीय महिला संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी खुर्दा उडवत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात दणदणीत सुरुवात केली आहे. भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दीप्ती शर्मा हीच्या फिरकीसमोर पाकिस्तानला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारतीय संघाने पाकिस्तानचं 18 बॉलआधी पॅकअप केलं. भारताने पाकिस्तानला 17 ओव्हरमध्ये 106 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताच्या या विजयात 5 खेळाडूंनी प्रमुख भूमिका बजावली.

दीप्ती शर्मा, श्री चरणी, ऋचा घोष, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना या 5 खेळाडूंनी भारताला 2 गुण मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोणत्या खेळाडूने काय काय केलं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

स्मृती मंधाना

स्मृती मंधाना हीने टीम इंडियासाठी सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. स्मृतीने या दरम्यान टी 20I क्रिकेटमधील 34 वं तर वर्ल्ड कप स्पर्धेतील पाचवं अर्धशतक झळकावलं. स्मृतीने या खेळीत 2 षटकारांसह 9 चौकार लगावले.

कॅप्टन हरमनप्रीत कौर

हरमनप्रीत कौर हीने कर्णधार म्हणून आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडलीच. तसेच हरमनप्रीतने स्मृतीनंतर भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. हरमनप्रीतने 36 धावा केल्या. तसेच हरमनप्रीतने एकूण 3 कॅचेस घेतल्या.

ऋचा घोष

ऋचा घोष हीने अखेरच्या टप्प्यात फटकेबाजी केली. ऋचाने 200 च्या स्ट्राईक रेटने 34 धावा ठोकल्या. ऋचाने या खेळीत 5 फोरसह 1 षटकार लगावला.

दीप्ती शर्मा

दीप्ती शर्मा हीने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी केली. दीप्तीने 9 बॉलमध्ये 12 रन्स केल्या. तसेच दीप्तीने 4 ओव्हरमध्ये 14 बॉल डॉट टाकले. तसेच दीप्तीने फक्त 10 धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. तर दीप्तीने पाकिस्तानसाठी सर्वाधिक 41 धावा करणाऱ्या ओपनर मुनीबा अली हीला रन आऊट केलं. दीप्तीला या ऑलराउंड कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.

दीप्ती शर्मा हीची चिवट बॉलिंग, टी 20i क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा 5 विकेट्स

Best Bowling Figures for India in WT20Is ✅
3⃣rd Best Bowling Figures in Women’s #T20WorldCup ✅

A record-breaking outing for Deepti Sharma 💙

Scorecard ▶ https://t.co/1tfRc3jcrX#TeamIndia | #WomenInBlue | @Deepti_Sharma06 pic.twitter.com/4KQ4FbtlPK

— BCCI Women (@BCCIWomen) June 14, 2026

श्री चरणी

तसेच श्री चरणी टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारी दुसरी गोलंदाज ठरली. श्री हीने 21 धावांच्या मोबदल्यात पाकिस्तानच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेने बंदी उठवली, आता इराण संपूर्ण जगाला तेल विकणार, भारताला होणार मोठा फायदा
  • IPL 2027: ऋषभ पंतने आयपीएल संघ बदलताच मोठा फटका, आता 27 कोटी नाही तर इतके पैसे मिळणार
  • महाभयंकर संकट आलं! नासाच्या नव्या अंदाजाने झोप उडाली, पावसाविषयी मोठं भाकित
  • शर्वरी वाघच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा,ग्लॅंमरस फोटो पाहून म्हणाल…
  • India vs Ireland: आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा प्रॉब्लेम सुटला, सूर्यांश शेडगेची एन्ट्री

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in