• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?

June 24, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचा हा वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील चौथा सामना असणार आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर निगर सुल्ताना हीच्याकडे बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. दोन्ही संघांसाठी सेमी फायनलच्या हिशोबाने हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. या निमित्ताने या सामन्यातील महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश वुमन्स सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश वुमन्स सामना गुरुवारी 25 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश वुमन्स सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश वुमन्स सामना एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर इथे आयोजित करण्यात आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश वुमन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश वुमन्स सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश वुमन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश वुमन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर https://www.tv9marathi.com/sports/cricket-news या लिंकवरील लाईव्ह ब्लॉगद्वारे सामन्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेता येईल.

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश वुमन्स सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश वुमन्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना

टीम इंडिया आणि बांगलादेश या दोन्ही संघांसाठी हा सामना उपांत्य फेरीच्या समीकरणानुसार अतिशय अटीतटीचा आहे. भारत आणि बांगलादेशने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर प्रत्येकी 1-1 सामना गमावला आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाला 5-5 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. उपांत्य फेरीत स्वत:च्या जोरावर आणि सुरक्षित पोहचायचं असेल तर कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आता गुरुवारी टीम इंडिया बांगलादेशला पराभूत करुन तिसरा सामना जिंकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video : कुत्र्याची चेन कोणी घालतं का? नव्या लुकमुळे मलायका ट्रोल; बॉडी शेपरचीही तुफान चर्चा !
  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन
  • Friday Remedies: शुक्रवारी करा ‘हे’ 5 सोपे उपाय; माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होईल पैशांची चणचण!
  • मोठी बातमी ! आता रूपाली चाकणकरांचं पुण्यात बार-रेस्टॉरंट, उद्घाटनाला बडे नेते, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in