• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

India vs Afghanistan, 3rd ODI: चेन्नई वनडे सामन्यात अर्शदीप सिंह खेळणार नाही, असा निर्णय घेण्याचं कारण की..

June 19, 2026 by admin Leave a Comment

IND vs AFG: अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. ही वनडे मालिका भारताने सलग दोन सामने जिंकून खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा वनडे हा औपचारिक असणार आहे. तिसरा वनडे सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियम येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डे्स्काथे यांनी एक संकेत दिला आहे. त्यानी आपल्या वक्तव्यात सांगितलं की, अर्शदीप सिंग खेळणार नाही, त्याला आराम दिला जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी अष्टपैलू नितीश रेड्डी याला संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्यामुळे चेन्नईत खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियात बदल होणार हे जवळपास निश्चित आहे.

भारत अफगाणिस्तान तिसरा वनडे सामन्यापूर्वी टेन डेस्काथे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘आम्ही संघात बदल करणार आहोत. पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळलेल्या काही खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. अर्शदीप सिंगने पहिल्या दोन सामन्यांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे; त्याला शनिवारच्या सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. एका फलंदाजालाही विश्रांती दिली जाऊ शकते.’ सहायक प्रशिक्षक टेन डेस्काथे यांनी स्पष्ट केलं की, भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांमध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे यशस्वी जयस्वालला आणखी एक संधी मिळणार हे निश्चित झालं आहे.

टेन डेस्काथे यांनी पुढे सांगितलं की, ‘आमची फलंदाजी उत्कृष्ट आहे, त्यात खूप विविधता आहे. पण तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर खेळणार नाही. आम्हाला यशस्वी जयस्वालला नक्कीच पाहायचे आहे, त्याने मागच्या सामन्यात जास्त धावा केल्या नाहीत.’ यशस्वी जयस्वाल दुसऱ्या वनडे सामन्यात फक्त 4 धावा करून बाद झाला होता. टेन डेस्काथे यांनी सांगितलं की, यशस्वी जयस्वालला कधी कधी संधी मिळेल, पण त्याला धावा कराव्या लागतील.

टेन डेस्काथे यांनी पुढे सांगितलं की, ‘गेल्या 18 महिन्यांत त्याच्या खेळात लक्षणीय सुधारणा झाली आहे, यावरून तो संघासाठी किती महत्त्वाचा आहे हे दिसून येते. माझा विश्वास आहे की रेड्डीची शरीरयष्टी पूर्वीपेक्षा खूपच मजबूत झाली आहे आणि तो हार्दिक पांड्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.’

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in