• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

INDA vs AFGA : भारतीय फलंदाजांचा तडाखा, अफगाणिस्तानसमोर 350 धावांचं आव्हान

June 12, 2026 by admin Leave a Comment

ट्राय नॅशन ए सीरिजमधील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी धमाका केला आहे. भारतीय फलंदाजांनी अफगाणिस्तान विरुद्ध विस्फोटक बॅटिंग केलीय. भारतीय संघाने अफगाणिस्तासमोर विजयासाठी 350 धावांचं आव्हान ठेवलं आहे. रंगिरी दांबुला क्रिकेट स्टेडियममध्ये भारताच्या एकूण तिघांनी 50 पेक्षा अधिक धावांची खेळी केली. तर दोघांनी 40 पेक्षा अधिक धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताला पावसाने प्रभावित सामन्यात 49 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 349 धावांपर्यंत मजल मारत आली. त्यामुळे आता अफगाणिस्तान या विजयी धावांचा पाठलाग करताना कुठपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरणार? त्यासाठी निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

भारताची बॅटिंग

अफगाणिस्तानने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी बोलावलं. भारताच्या पहिल्या 8 पैकी प्रियांश आर्या आणि आयुष बडोनी या दोघांचा अपवाद वगळता इतर 6 फलंदाजांनी फटकेबाजी करत भारताला 349 धावांपर्यंत पोहचवण्यात योगदान दिलं. प्रभसिमरन सिंह, वैभव सूर्यवंशी, कर्णधार तिलक वर्मा, उपकर्णधार तिलक वर्मा, सूर्यांश शेडगे आणि अनूकुल रॉय या 6 फलंदाजांनी दुहरी आकड्यात धावा केल्या. तर प्रियांश आर्या आणि आयुष बडोनी या दोघांनी निराशा केली. प्रियांश आर्या 8 धावांवर बाद झाला. तर आयुषला भोपळाही फोडता आला नाही.

प्रभसिमरन सिंहचा तडाखा

प्रभसिमरन सिंह याने भारतासाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. प्रभसिमरन याने 69 बॉलमध्ये 121.74 च्या स्ट्राईक रेटने 84 रन्स केल्या. प्रभने या खेळीत 14 चौकार लगावले. ऋतुराज आणि तिलक या दोघांनी प्रत्येकी 66 धावा केल्या. ऋतुराजने 80 बॉलमध्ये 3 सिक्ससह 66 रन्स केल्या. तर तिलकने 66 धावांच्या खेळीत 5 चौकार लगावले.

भारताची फलंदाजांचा अफगाणिस्तान विरुद्ध तडाखेदार बॅटिंग

Innings Break!

India A put up a strong total of 3⃣4⃣9⃣/9 against Afghanistan A 💪

Prabhsimran Singh led the charge with 8⃣4⃣(69) 👏

Scorecard ▶ https://t.co/dMNsGrzIOD#INDAvAFGA | #TriNationSeries

(Image credit: Sri Lanka Cricket) pic.twitter.com/7tRDz6cgyS

— BCCI (@BCCI) June 11, 2026

बेबी बॉस वैभव सूर्यवंशी याला चाबूक सुरुवात मिळाली. त्यामुळे वैभव अर्धशतक झळकावणार असं वाटत होतं. मात्र तेव्हाच वैभव आऊट झाला. वैभवने 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. वैभवने 22 चेंडूत 9 चौकारांसह 44 धावा केल्या. सूर्यांश शेडगे याने 40 रन्स केल्या. तर अनुकूल रॉय याने 16 धावांची नाबाद खेळी केली. विपराजन निगम याने 8 आणि अर्शद खान याने 1 धावा केली. तर अफगाणिस्तानसाठी अब्दुल्लाह अहमदझाई याने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. फरमानुल्लाह सफी याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कर्णधार इम्रान मीर याने 1 विकेट मिळवली.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in