• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ZIM : इशान किशनचं शतक हुकलं, पण किंग कोहलीचा विक्रम मोडला; काय ते जाणून घ्या

July 25, 2026 by admin Leave a Comment


झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात इशान किशनने 81 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. इशानचं शतक फक्त 19 धावांनी हुकलं. पण या त्याने 81 धावांची खेळी करत विराट कोहलीला मागे टाकलं आहे. (Photo: BCCI)

इशान किशनने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर पुढच्या 13 चेंडूत 41 धावा आणखी जोडल्या आणि 81 धावा केल्या. यासह आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्यात विराट कोहलीला मागे टाकलं आहे. एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा मान पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या नावावर आहे. (Photo: BCCI)

इशान किशनने या वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 783 धावा केल्या आहेत. विराट कोहलीला मागे टाकत सातवा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने 2022 मध्ये 781 धावा केल्या होत्या, आता आठव्या स्थानी आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान 1326 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. (Photo: BCCI)

भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव याने 2022 मध्ये 1164 धावा केल्या होत्या. तो या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये रिझवनने 996 धावा केल्या होत्या. यासह तिसऱ्या स्थानावर आहे. बाबर आझमने 2021 मध्ये 939 धावा केल्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. (Photo: PTI)

झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेटने 2025 मध्ये 936 धावांसह पाचवं स्थान गाठलं होतं. अभिषेक शर्माने 2025 मध्ये 859 धावांसह या यादीत सहावं स्थान गाठलं होतं. आता इशान किशन सातव्या क्रमांकावर आहे. आता इशानकडे मोठी संधी आहे. (Photo : BCCI Twitter)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Daily Horoscope : 27 ऑगस्टचा दिवस ठरणार खास, 4 राशींचे नशीब फळफळणार!
  • नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
  • नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
  • मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
  • मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in