• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ZIM: अभिषेक शर्माचा तिसऱ्या टी20 सामन्यातून पत्ता कट होणार! दुसऱ्या सामन्यात नेमकं काय घडलं?

July 25, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी20 मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. त्यामुळे भारत चांगली सुरूवात करेल अशी अपेक्षा होती. मात्र अभिषेक शर्माने या सामन्यातही निराशा केली. अभिषेक शर्माने 8 चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकार मारून बाद झाला. त्यामुळे पुन्हा एकदा एकेरी धावसंख्येवर बाद झाल्याने त्याचं संघातील स्थान डळमळीत झालं आहे. अभिषेक शर्माचा फॉर्म गेल्या काही दिवसात खूपच ढासळल्याचं दिसून आलं आहे. 2026 वर्ष त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीसाठी उताराचं ठरलं आहे. काही मालिकांमध्ये अभिषेक शर्मा पूर्ण फेल गेला आहे. वर्ष 2026 मध्ये अभिषेक शर्माने एकूण 18 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 190.19 च्या स्ट्राईक रेटने 421 धावा केल्या. टी20 वर्ल्डकप 2026, आयर्लंड दौरा आणि इंग्लंड दौऱ्यातील त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. हाच कित्ता झिम्बाब्वे दौऱ्यातही गिरवत आहे.

अभिषेकचं प्लेइंग 11 मधील स्थान संकटात

अभिषेक शर्माची झिम्बाब्वे दौऱ्यातही बॅट काही चालली नाही. पहिल्या सामन्यात 1 धाव करून बाद झाला होता. दुसऱ्या सामन्यात 8 या एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे. त्यामुळे त्याची प्लेइंग 11 मधील जागा डळमळीत झाली आहे. त्याची जागा घेण्यासठी संघात प्रभसिमरन सिंग आणि सूर्यांश शेडगे हे दोन पर्याय आहेत. त्यात प्रभसिमरन सिंगला संधी मिळू शकते. कारण भारताच डावं उजवं कॉम्बिनेशन ओपनिंगला उतरू शकते. प्रभसिमरन उजवा, तर वैभव डावखुरा फलंदाज आहे. ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघाची लाईन आणि लेन्थ बिघडू शकते. प्रभसिमरन पॉवरप्लेच्या 6 षटकात अत्यंत आक्रमकपणे खेळतो.त्यामुळे भारताला वेगवान सुरुवात मिळू शकते.तर सूर्यांश हा अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र त्याला संधी मिळणं कठीण आहे.

अभिषेक शर्माची या वर्षातील कामगिरी

  • या वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच फेब्रुवारी मार्चमध्ये आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळली गेली. त्या स्पर्धेत अभिषेकने 8 सामने खेळले आणि 141 धावा केल्या. यात सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाला होता. तर न्यूझीलंडविरुद्ध थेट अंतिम सामन्यात 21 चेंडूत 52 धावांची खेळी केली होती.
  • आयर्लंड दौऱ्यात अभिषेक शर्मा दोन सामने खेळला आणि एका सामन्यातच त्याची बॅट चालली. पहिल्या सामन्यात अभिषेक शर्माने 20 चेंडूत 49 धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे त्याने या दौऱ्यात एकूण 49 धावा केल्या.
  • इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत त्याने एकूण 131 धावा केल्या. यात पहिल्या दोन सामन्यात त्याची बॅट चालली. पण उर्वरित तीन सामन्यात निराशा पदरी पडली. 59, 43, 10, 16 आणि 3 धावा करून बाद झाला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in