• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SL : 2 कसोटी-3 टी 20i;टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार! कधीपासून सुरुवात?

June 10, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचं पुढील काही महिन्यात फार बिझी शेड्युल आहे. टीम इंडिया सातत्याने क्रिकेट सामने खेळणार आहे. टीम इंडिया मायदेशात 13 जूनपासून अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. तर इंग्लंड विरुद्ध भारतीय संघाला टी 20i आणि वनडे सीरिज खेळायची आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी पुढील काही महिने पर्वणी असणार आहे. अशात आता टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्नुसार, टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात डब्ल्यूटीसी साखळी अंतर्गत (WTC 2025-2027) कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. उभयसंघात एकूण 2 कसोटी सामने नियोजित आहेत. डब्ल्यूटीसी 2025-2027 या साखळीच्या हिशोबाने दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्त्वाची ठरणार आहे.

कसोटी मालिका

क्रिकबझनुसार, पहिला कसोटी सामना हा 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. तर दुसऱ्या सामन्याची तारीख निश्चित नाहीय. रिपोर्ट्सनुसार, दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्टपासून कोलंबोतील सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्याचं अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही.

कसोटीनंतर टी 20I मालिकेचा थरार

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात कसोटी मालिकेनंतर उभयसंघात टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 3 सामन्यांच्या टी 20I मालिकेसाठी विनंती केल्याचे संकेत बीसीसीआय सचिव देवजित सैकीया यांनी दिले होते. त्यामुळे लवकरच टी 20I मालिकेचं वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे टी 20I मालिकेची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.

दरम्यान टीम इंडिया 2017 साली अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर गेली होती. तेव्हा भारताने विराट कोहली याच्या नेतृत्वात श्रीलंकेला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश केलं होतं. त्यामुळे आता श्रीलंका क्रिकेट टीमसमोर भारतीय संघाविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याच्या अधिकृत वेळापत्रकाची प्रतिक्षा असणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 2004 कॉल्स… 238 तास गप्पा… चेतनच्या प्रेमात अखंड बुडाली होती सिया.. केतन अग्रवाल हत्याकांडात तो एक धाग ठरला महत्त्वाचा
  • अखेर इराण झुकला… अमेरिकेची ती अट मान्य, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ
  • जवळ असतील हे गुण तर तिजोरी जाईल भरून, श्रीमंती घेईल पायाशी लोळण, चाणक्य नीती काय सांगते?
  • दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर अडचणीत, तरूणीने गंभीर आरोप करत पोलिसात नोंदवली तक्रार
  • Lavender Marriage: अरेंज, लव्ह नंतर हा लॅव्हेंडर मॅरेज काय प्रकार आहे ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in