• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SL : श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी बुमराह, शुबमन गिलच्या इंजरीबद्दल महत्वाची अपडेट

July 30, 2026 by admin Leave a Comment

India tour of Sri Lanka 2026 : श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडिया 4 ऑगस्टला रवाना होणार आहे. त्याआधी जसप्रीत बुमराह आणि शुबमन गिल यांच्या इंजरीबद्दल महत्वाची अपडेट आहे. दोन्ही खेळाडू रिकवरीच्या वाटेवर आहेत. हळूहळू दोघे तंदुरुस्त होत आहेत. दोघेही श्रीलंकेविरद्ध कसोटी मालिका सुरु होण्याआधी फिट होण्याची शक्यता आहे. गिल आणि बुमराहशिवाय साई सुदर्शनच्या फिटनेसवर सुद्धा अपडेट आहे. TOI च्या रिपोर्टनुसार तो पुढच्या आठवड्यापासून फलंदाजीला सुरुवात करेल.

जसप्रीत बुमराहला इंग्लंड विरुद्ध वनडे सीरीजच्यावेळी दुखापत झाली होती. त्याचा गुडघा सुजलेला. बुमराहला ही दुखापत इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सवरील तिसर्‍या वनडे सामन्यात झाली होती. आता बीसीसीआयच्या मेडिकल टीमनुसार, गॉलमध्ये 15 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या भारत-श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्यासाठी तो फिट असेल. श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियात बुमराहची निवड फिटनेसच्या आधारावरच केली आहे. TOI रिपोर्ट्नुसार बुमराह हळूहळू गोलंदाजीतील आपला वर्कलोड वाढवायला सुरुवात करेल. सध्या तो सेंटर ऑफ एक्सलेंस बंगळुरुमध्ये आहे. बुमराह या आठवड्यात गोलंदाजीचा सराव सुरु करेल. हळूहळू तो गोलंदाजीचं प्रमाण वाढवत जाईल.

गिल मानेच्या दुखापतीने त्रस्त आहे

रिपोर्ट्नुसार, मानेच्या समस्येचा सामना करणाऱ्या शुबमन गिलसाठी बीसीसीआयची मेडिकल टीम बाहेरच्या स्पेशलिस्ट डॉक्टरची मदत घेत आहे. गिल मानेच्या दुखापतीने त्रस्त आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता येथे टेस्ट मॅच झाली. त्यावेळी बुमराहला पहिल्यांदा त्रास झालेला. आयपीएलच्यावेळी मानेमुळे गिल काही सामन्यांना मुकला होता.

मेडिकल टीमचं बुमराहवर सतत लक्ष

भारतासाठी श्रीलंका दौरा WTC च्या दृष्टीने महत्वाचा आहे. गिल आणि बुमराह दोघे भारतीय संघाचे महत्वाचे सदस्य आहेत. या दोघांमुळे संघाची ताकद कमी व्हावी अशी बीसीसीआयची इच्छा नाहीय. बीसीसीआयच्या मेडिकल टीमचं बुमराहवर सतत लक्ष आहे. गिलसाठी बाहेरच्या स्पेशलिस्टची मदत घेतली जातेय.

गिल आणि बुमराहशिवाय साई सुदर्शनबद्दल सुद्धा अपडेट आहे. तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमधून सावरला आहे. पुढच्या आठवड्यापासून BCCI च्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये फलंदाजीचा सराव सुरु करेल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in