
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचं ध्येय ठेवून टीम इंडिया मैदानात उतरली आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी आजपासून सुरू होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे करो या मरोची स्थिती असणार आहे. अशा स्थितीत नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला. शुबमन गिलने खेळपट्टीचा अंदाज घेऊन लगेचच फलंदाजीचा निर्णय घेतला. कारण गॉलच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी मोठी धावसंख्या करण्याची संधी असते. तसेच तिसऱ्या दिवसापासून ही खेळपट्टी फिरकीला मदत करते. त्यामुळे नाणेफेकीचा टीम इंडियाच्या बाजूने लागल्याने क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला आहे. विशेष म्हणजे भारताचा हा 600 वा कसोटी सामना आहे. त्यामुळे या सामन्याला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालं आहे.
Leave a Reply