• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SL: गौतम गंभीरसोबत गॉलमध्ये काय घडलं होतं? प्रशिक्षक म्हणून आता आव्हान पेलणार का?

August 11, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा पहिल्या कसोटी सामन्यात कस लागणार आहे. हा कसोटी सामना गॉलमध्ये होणार आहे आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा या मैदानात पाय ठेवणार आहे. हा कसोटी सामना 15 ऑगस्टपासून सुरू होणार असून प्रशिक्षक गौतम गंभीरचा कस लागणार आहे. या मैदानात गौतम गंभीर या पूर्वी एक खेळाडू म्हणून उतरला होता. पहिल्यांदा चांगली कामगिरी करून लक्ष वेधलं होतं. त्यानंतरण दोन्ही डावात फेल गेला आणि टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे गौतम गंभीरची जखम पुन्हा एकदा ओली झाली आहे. चला जाणून घेऊयात खेळाडू म्हणून गौतम गंभीरची कामगिरी कशी होती? आणि आता हेड कोच म्हणून काय आव्हानं असणार आहे ते..

गौतम गंभीर, गॉल आणि बरंच काही…

गौतम गंभीर एक खेळाडू म्हणून या मैदानात दोन कसोटी सामने खेळला आहे. पहिल्यांदा 2008 भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आला होता. तेव्हा गौतम गंभीरने श्रीलंकन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं. पहिल्या डावात गौतम गंभीरने 56 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही 74 धावा काढल्या होत्या. याच सामन्यात वीरेंद्र सेहवागने पहिल्या डावात द्विशतक ठोकलं होतं. त्याने नाबाद 201 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने 170 धावांनी जिंकला होती.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारतीय संघ 2010 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर होता. याच मैदानात 18 जुलै 2010 रोजी कसोटी सामना पार पडला होता. तेव्हा श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 520 धावा केल्या होत्या. भारताचा पहिला डाव 276 धावांवर आटोपला होता. या डावात गौतम गंभीर फक्त 2 धावा करून बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात गौतम गंभीरला खातंही खोलता आलं नव्हतं. दोन्ही डावात मलिंगाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला होता. हा सामना श्रीलंकेने 10 विकेटने जिंकला होता.

हेच कोच म्हणून गौतम गंभीरसमोर काय आव्हान?

भारतीय संघ गेल्या काही वर्षात फिरकीचा सामना करण्यात अकार्यक्षम ठरला आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिका त्याचं उत्तम उदाहरण आहे. या दोन्ही कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाजी भारतीय संघावर भारी पडली. आता गॉल मैदान देखील फिरकीला मदत करणारं आहे. त्यामुळे भारतीय संघ फिरकीचा सामना करेल का? असा प्रश्न आहे. त्यात भारतीय संघात अनुभवी खेळाडूंची उणीव प्रकर्षाने दिसणार आहे. काही खेळाडू बरीच वर्षे खेळत आहेत. पण त्या जबाबदारी सामना जिंकवण्याची क्षमता मात्र थोडी कमीच दिसत आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in