• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs SL: गॉल कसोटी सामन्यात कोण खेळणार? प्लेइंग 11 बाबत शुबमन गिलने अशी दिली हिंट

August 14, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक आहे.गॉलमधील खेळपट्टीचा अंदाज घेऊन प्लेइंग 11 काय असेल? याबाबत उत्सुकता आहे. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असणार आहे, यात काही शंका नाही. पण त्याला दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून कोण साथ देणार? हा प्रश्न आहे. प्रसिद्ध कृष्णा की गुरनूर ब्रार याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये संभ्रम आहे. असं असताना शुबमन गिलने या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत काही संकेत दिले आहेत. त्यामुळे दुसऱ्या वेगवान गोलंदाजाचा तिढा सुटल्याचं दिसत आहे. पण कर्णधाराने या दोघांपैकी एकाची निवड करणं कठीण असल्याचं सांगितलं. पण प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीचं कौतुक करण्यास विसरला नाही.

प्रसिद्ध कृष्णा की गुरनूर ब्रार? कोणाची निवड होणार?

भारतीय संघात चार वेगवान गोलंदाज आहेत. त्यापैकी मोहम्मद सिराज असणार हे निश्चित आहे. तर आकिब नबी या शर्यतीतून आऊट झाला आहे. त्यामुळे गुरनूर ब्रार आणि प्रसिद्ध कृष्णा यापैकी एकाची निवड होऊ शकते. पण शुबमन गिलने प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीचं कौतुक केल्याने आता त्यालाच प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल, असे संकेत मिळत आहे. शुबमन गिलने कसोटी सामन्याच्या एक दिवस सांगितलं की, गुरनूर ब्रार जुन्या चेंडूसह प्रभावी गोलंदाजी करतो. त्याच्याकडे चांगला वेग आणि उसळीही आहे. पण दुसरीकडे, प्रसिद्ध सध्याच्या सामन्यात चांगली गोलंदाजी करत आहे. प्रसिद्ध कृष्णाने 7 कसोटी सामन्यात 25 विकेट घेतल्या आहे.

गॉलच्या खेळपट्टीचा अंदाज घेऊन तीन फिरकीपटूंना संधी मिळेल अशी दाट शक्यता आहे. यात रवींद्र जडेजा, मानव सुथार आणि कुलदीप यादव हे फिरकीपटूची जबाबदारी सांभाळतील. तर वेगवान गोलंदाजीची धुरा सिराज आणि प्रसिद्धच्या खांद्यावर असू शकते. साई सुदर्शन नसल्याने तिसऱ्या क्रमांकावर देवदत्त पडिक्कलला संधी मिळेल. तर मधल्या फळीत ध्रुव जुरेलला संधी मिळू शकते. त्यामुळे सरफराज खानला बेंचवर बसावं लागू शकते.

भारताची संभाव्य प्लेइंग 11: शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, ऋषभ पंत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब
  • कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट…
  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in