• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs PAK, Women’s T20 World Cup 2026: भारत पाकिस्तान सामना केव्हा आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

June 13, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध मैदानात भिडणार म्हंटलं तर क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह असतो. दोन्ही संघांचे चाहते आधीपासून या सामन्यासाठी उत्सुक असतात. सोशल मीडियापासून प्रत्यक्ष मैदानात आपआपल्या संघांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचतात. भारत आणि पाकिस्तान हे संघ आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ही संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिला सामना होत आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयी सलामी देण्यासाठी सज्ज आहे. तसं पाहिलं तर आंतरराष्ट्रीय टी20 स्पर्धेत भारताचा वरचष्मा आहे. भारताने आतापर्यंत 16 पैकी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. भारत आणि पाकिस्तान शेवटचे 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भिडले होते. तेव्हा भारताने सहा गडी राखून विजय मिळवला होता.

भारत विरुद्ध पाकिस्तान, महिला टी20 वर्ल्डकप सामना कधी खेळला जाईल?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला टी20 वर्ल्डकप सामना रविवारी (14 जून, 2026) खेळला जाईल. नाणेफेक भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता होईल. तर सामना 7 वाजता सुरू होईल.

सामना कुठे खेळला जात आहे?

हा सामना बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे आयोजित केला जाईल.

क्रीडाप्रेमींना टेलिव्हिजनवर सामना कुठे पाहू शकतात?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्सवर उपलब्ध असेल.

भारत विरुद्ध पाकिस्तान, महिला वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 चे थेट प्रक्षेपण (लाइव्हस्ट्रीम) कुठे पाहावे?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वुमन्स टी20 वर्ल्डकप सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

दोन्ही संघाचे खेळाडू

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, श्री चरणी, यस्तिका भाटिया, नंदनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव.

पाकिस्तान : फातिमा सना (कर्णधार), गुल फिरोजा, आयेशा जफर, इरम जावेद, आयमान फातिमा, आलिया रियाझ, नतालिया परवेझ, सायरा जबीन, मुनीबा अली, तुबा हसन, रमीन शमीम, सादिया इक्बाल, नशरा संधू, डायना बेग, तस्मिया रुबाब

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in