• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs PAK : आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान भिडणार, सामना कधी?

August 6, 2026 by admin Leave a Comment


वुमन्स टी20 आशिया कप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यंदाचं या स्पर्धेचं 10वं पर्व असून टी20 फॉर्मेटमधील सहावं पर्व आहे. आशिया क्रिकेट परिषदेने वेळापत्रकाची घोषणा केली आहे. 28 ऑगस्ट 2026 पासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने युएईमधील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून त्याची अ आणि ब अशा दोन गटात विभागणी केली आहे. अ गटात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत पाकिस्तान संघ आहे. या गटात भारत पाकिस्तानसह थायलंड आणि हॉगकाँग हे संघ आहे. तर ब गटात गतविजेत्या श्रीलंका संघासह बांग्लादेश, युएई आणि इंडोनेशिया संघ आहे. प्रत्येक गटातील संघ आपापसात साखळी सामने खेळतील. त्यामुळे क्रीडाप्रेमींना हायव्होल्टेज भारत पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे.

भारत पाकिस्तान सामना कधी आणि वेळ काय?

वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने आमनेसामने येणार हे निश्चित आहे. या दोन्ही संघातील महामुकाबला 5 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. तर नाणेफेकीचा कौल हा संध्या 7.30 वाजता होणार आहे. महिला आशिया कपच्या इतिहासात भारतीय संघाचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. दोन्ही संघ या स्पर्धेत सहा वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने पाच वेळा बाजी मारली आहे. तर पाकिस्तानला 2022 च्या पर्वात फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.

𝐓𝐡𝐞 𝐰𝐚𝐢𝐭 𝐢𝐬 𝐨𝐯𝐞𝐫 🙌

The official fixtures for the #𝐃𝐏𝐖𝐨𝐫𝐥𝐝𝐖𝐨𝐦𝐞𝐧𝐬𝐀𝐬𝐢𝐚𝐂𝐮𝐩𝟐𝟎𝟐𝟔 are here. All matches will be played under lights at the Dubai International Stadium as Asia’s finest go head-to-head for continental glory 🏆#ACC pic.twitter.com/p4PgjbtdIW

— AsianCricketCouncil (@ACCMedia1) August 6, 2026

महिला टी20 आशिया कप 2026 सामन्यांचे वेळापत्रक

  • थायलंड विरुद्ध हाँगकाँग, 28 ऑगस्ट 2026
  • श्रीलंका विरुद्ध युएई, 29 ऑगस्ट 2026
  • भारत विरुद्ध थायलंड, 30 ऑगस्ट 2026
  • बांगलादेश विरुद्ध इंडोनेशिया, 31 ऑगस्ट 2026
  • पाकिस्तान विरुद्ध थायलंड, 1 सप्टेंबर 2026
  • श्रीलंका विरुद्ध इंडोनेशिया, 2 सप्टेंबर 2026
  • भारत विरुद्ध हाँगकाँग, 3 सप्टेंबर 2026
  • युएई विरुद्ध इंडोनेशिया, 4 सप्टेंबर 2026
  • पाकिस्तान विरुद्ध भारत, 5 सप्टेंबर 2026
  • श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, 6 सप्टेंबर 2026
  • पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग, 7 सप्टेंबर 2026
  • बांगलादेश विरुद्ध युएई, 8 सप्टेंबर 2026

उपांत्य फेरीचा पहिला सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना 11 सप्टेंबरला असेल. तर 13 सप्टेंबरला अंतिम सामना होईल.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in