• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ENG 4th T20: मालिका पराभवाचं सावट, नाणेफेकीनंतर श्रेयस अय्यर प्लेइंग 11 बाबत म्हणाला…

July 9, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी20 सामना ब्रिस्टोलच्या काउंटी ग्राउंडवर होत आहे. हा सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. कारण हा सामना टीम इंडियासाठी करो या मरोची लढाई आहे. या मालिकेतील तीन सामन्यानंतर इंग्लंडने 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका विजयाची संधी टीम इंडियाच्या हातून गेली आहे. आता मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. असं असताना हा सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. यापूर्वी टीम इंडियाने आयर्लंडविरुद्धची मालिका गमावली आहे. आता इंग्लंडविरुद्धची मालिका गमवण्याचं सावट आहे. दरम्यान, या सामन्यातही नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय म्हणाला श्रेयस अय्यर?

कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. आम्ही त्यांची निर्भयता पाहिली, पण आम्हाला आमच्या योजना प्रत्यक्षात आणता येत नाहीत. मुले उत्साहात आहेत. आम्हाला खेळाची जाणीव ठेवून पटकन परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. डावपेचांच्या बाबतीत आम्हाला सज्ज राहावे लागेल. खेळपट्टी चांगली दिसत आहे. आम्ही दोन बदल केले आहेत. वॉशिंग्टन आणि प्रसिद्ध गोलंदाजीसाठी आले आहेत.’

 काय म्हणाला हॅरी ब्रूक?

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक म्हणाला की, आम्ही फलंदाजी केली असती. इथे गवत छान, एकसारखे पसरले आहे. आमच्यात खूप चांगला संवाद होता आणि सांघिक कामगिरीही खूप चांगली होती. मालिका जिंकणे खूप छान वाटेल. आमच्याकडे खूप चांगले खेळाडू आहेत. लियाम डॉसनच्या जागी रेहान संघात आला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.

भारत (प्लेइंग इलेव्हन) : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ट्रेनचा प्रवास करताना यात ७ चुका महागात पडतील, काय आहेत नियम वाचा….
  • GK : केवळ RUM च्या निर्मितीमुळे मुंबईतील हे स्थानक अस्तित्वात आले ?
  • फिफा विश्वचषकातून 40 संघ आऊट, आता 8 संघ जेतेपदाच्या शर्यतीत; असं आहे उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक
  • क्रिकेट सामन्यात बॅट्समनच्या हातून बॅट सटकली आणि फिल्डरच्या डोक्याला लागली, काही तासातच मृत्यू
  • लवकर बरा हो… अभिनेता राजेश शर्माच्या तब्ब्येतीबाबत अक्षय कुमार चिंतेत, विषारी किडा चावल्याने संसर्ग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in