• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली

July 19, 2026 by admin Leave a Comment


भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडे सामन्याचा निकाल निराशाजनक लागला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने या निर्णयाचा पुरेपूर फायदा उचलला. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी अक्षरश: रडवलं. तसेच 50 षटकात 3 गडी गमवून 387 धावा केल्या. यासह भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान काही भारतीय संघाला गाठता आलं नाही. भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 360 धावा केल्या. हा सामना भारताने 27 धावांनी गमावला. यासह भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 1-2 ने गमावली आहे. टी20 मालिकेनंतर भारताचा वनडे मालिकेतही पराभव झाला आहे. दुसरीकडे, रोहित शर्माच्या शतकी खेळीही पाण्यात गेली.

इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 388 धावांचं आव्हान गाठताना भारताने आश्वासक सुरूवात केली. खरं तर हे खूपच कठीण आव्हान होतं. पण कर्णधार शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरूवात करून दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी केली. शुबमन गिल 77 धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मोर्चा सांभाळला. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने 86 चेंडूत 113 धावांची भागीदारी केली. ही जोडी असेपर्यंत भारताच्या विजयाच्या आशा कायम होत्या. मात्र ही जोडी फुटली आणि पराभवाची स्क्रिप्ट लिहिण्यास सुरूवात झाली. रोहित शर्मा 110 चेंडूत 138 धावा करून बाद झाला. यानंतर भारताच्या धावगतीत कमालीचा घसरण झाली.

रोहित शर्माच्या विकेटनंतर मैदानात आलेला इशान किशनही काही खास करू शकला नाही. त्याने 12 चेंडूत 14 धावा केल्या आणि तंबूत परतला. उपकर्णधार श्रेयस अय्यर सामना संपवेल अशी आशा होती. पण त्याने तीन चेंडू खेळले आणि शून्यावर बाद झाला. त्यामुळे झटपट धावा करण्याचा भार एकट्या विराट कोहलीवर आला. त्याने 60 चेंडूत 74 धावांची खेळी केली. पण उत्तुंग फटका मारण्याचा नादात बाद झाला. कारण धावा आणि चेंडूत याच्यात कमालीची तफावत होती. त्यामुळे त्याला जोखीम घेण्याशिवाय पर्याय नव्हता. केएल राहुल 8 चेंडूत 12 धावा करून बाद झाला आणि पराभव निश्चित झाला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्… आदिती तटकरेंच्या मृत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
  • Indus Water Treaty : भारताने ताकद दाखवली, सिंधू जल करारावर वर्ल्ड बँकेच्या निर्णयाला दाखवली केराची टोपली, पाकिस्तानला दिला झटका
  • पाकिस्तान संघ आहे की नाटक कंपनी..! इमाम उल हकचा ड्रामा पाहून स्टूअर्ट ब्रॉडचा संताप, म्हणाला..
  • अंबानींनाही टक्कर देतंय मुंबईतील एक कुटुंब, जमीन एवढी की अँटालियाही काहीच नाही… या उद्योजकाचं तुमच्याशीही खास कनेक्शन
  • मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख… 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in