
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार हा प्लेइंग 11 चा भाग आहे. कारण त्याने पहिल्या वनडे सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली होती. पण त्याला पहिल्या सामन्यातील चुकीचा फटका बसला आहे. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयसीसीने त्याला दंड ठोठावला आहे. (फोटो-GETTY IMAGES)
गुरनूर ब्रारने एजबेस्टनमध्ये रंगलेल्या पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडचा ओपनर बेन डकेटच्या दिशेने रागात चेंडू फेकला होता. हा चेंडू त्याला लागला असता, पण थोडक्यात वाचला. सामनाधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली होती आणि त्याला दंड ठोठावला आहे. (फोटो-GETTY IMAGES)
गुरनूर ब्रारच्या या कृत्यानंतर आयसीसीने त्याला ताकीद दिली आहे. तसेच एक डिमेरिट गुण दिला आहे. त्यामुळे 24 महिन्यात त्याचा हा पहिला गुन्हा पकडला जाणार आहे. (फोटो-GETTY IMAGES)
गुरनूर ब्रारने आपली चूक कबूल केली असून सामनाधिकारी रिची रिचर्डसनकडून मिळालेली शिक्षाही मान्य केली आहे. त्यामुळे गुरनूर ब्रार सामनाधिकाऱ्यांपुढे गेला नाही. (फोटो-GETTY IMAGES)
गुरनूर ब्रारने पहिल्या वनडे सामन्यात 61 धावा देत 2 गडी बाद केले होते. त्याने बेन डकेट आणि जेकब बेथेल यांची विकेट काढली होती. (फोटो-GETTY IMAGES)




Leave a Reply