• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs AFG : मानव सुथारचा पदार्पणात धमाका, अफगाणिस्तानचं 152 धावांवर पॅकअप, टीम इंडियाकडून फॉलोऑन

June 8, 2026 by admin Leave a Comment

डेब्युटंट मानव सुथार याने केलेल्या जादुई बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियासमोर अफगाणिस्तानला पहिल्या डावात 152 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (7 जून) पहिला डाव हा 564 धावांवर घोषित केला. अफगाणिस्तानला प्रत्युत्तरात फक्त 152 धावांपर्यंतच पोहचता आलं. मानव सुथार याने पदार्पणात आपला ठसा उमटवला. मानवने 22 ओव्हर बॉलिंग केली. मानवने या दरम्यान अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स मिळवल्या. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात 412 धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे टीम इंडियाने दुसऱ्या डावात बॅटिंग करण्याऐवजी अफगाणिस्तानला फॉलोऑन दिला आहे. आता अफगाणिस्तान दुसऱ्या डावात किती धावा करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अफगाणिस्तानची बॅटिंग

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना हा न्यू चंडीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. अफगाणिस्तानने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला 5 आऊट 113 रन्सपासून सुरुवात केली. मात्र टीम इंडियाने पहिल्याच सत्रात अवघ्या 39 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानला 5 झटके देत ऑलआऊट केलं. अफगाणिस्तानकडून फक्त एकाच फलंदाजाला अर्धशतक करता आलं. अफगाणिस्तानसाठी रहमत शाह याने सर्वाधिक 60 धावा केल्या.

मानव सुथारचा षटकार

टीम इंडियाचा 23 वर्षीय फिरकीपटू मानव सुथार याने अफगाणिस्तानच्या निम्म्या संघाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मानवने दुसऱ्या दिवशी अफगाणिस्तानला 5 पैकी 3 झटके दिले होते. तर मानवने तिसऱ्या दिवशीही उर्वरित 5 पैकी 3 विकेट्स मिळवल्या. अशाप्रकारे मानव एकूण 6 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला. तसेच इतरांनीही त्याला चांगली साथ दिली. प्रसिध कृष्णा याने तिघांना आऊट केलं. तर वॉशिंग्टन सुंदर याने 1 विकेट मिळवली.

अफगाणिस्तानचं 152 धावांवर पॅकअप, न्यू चंडीगडमध्ये भारताकडून फॉलोऑन

Manav Suthar leads the way with a magnificent 6⃣-wicket haul 👏#TeamIndia have a huge first-innings lead of 412 runs and have enforced the follow-on 👌

Scorecard ▶ https://t.co/Au50EfVM30#INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/oZUI4AehL6

— BCCI (@BCCI) June 8, 2026

अफगाणिस्तानला फॉलोऑन, तिसऱ्या दिवशी निकाल?

दरम्यान अफगाणिस्तानला ऑलआऊट केल्यानंतर टीम इंडियाकडे 400 पेक्षा अधिक धावांची आघाडी होती. त्यामुळे टीम इंडियाने अफगाणिस्तानला फॉलोऑन देणं अपेक्षित होतं. कर्णधार शुबमन गिल याने तसंच केलं. शुबमनने अफगाणिस्तानला फॉलोऑन दिला आणि बॅटिंगसाठी बोलावलं. त्यामुळे आता अफगाणिस्तानवर डावाने पराभूत होण्याची टांगती तलवार आहे. आता टीम इंडियाचे गोलंदाज अफगाणिस्तानला गुंडाळून तिसऱ्याच दिवशी विजयी होणार की अफगाणिस्तान झुंज देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in