• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs AFG: भारताने पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला नमवलं, शुबमन गिलची विजयी खेळी

June 13, 2026 by admin Leave a Comment

भारताने अफगाणिस्तानला पहिल्या वनडे सामन्यात 7 गडी राखून पराभवाची धूळ चारली. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला होता आणि कर्णधार शुबमन गिलने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पावसाच्या व्यत्यय आल्याने हा सामना चार तास उशिराने सुरू झाला. त्यामुळे हा सामना 25 षटकांचा करण्यात आला होता.  अफगाणिस्तानने या सामन्यात 24.5 षटकात सर्व गडी गमवून 194 धावा केल्या आणि विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना भारताने सावध सुरूवात केली. तर शुबमन गिलने शेवटपर्यंत तग धरून भारताला विजयाच्या वेशीवर आणून सोडलं. शुबमन गिलने 66 चेंडूत 44 चौकार आणि 2 षटकार मारत नाबाद 84 धावांची खेळी केली. तर केएल राहुलने 19 चेंडूत 4 चौकार आणि तीन षटकार मारत नाबाद 39 धावांची खेळी केली. भारताने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत केलं. या विजयानंतर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी मिळवली.

भारताचा डाव

विजयी धावांचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात उतरली. रोहित शर्मा 16 धावांवर असताना धावचीत झाला. तेव्हा संघाच्या 46 धावा होत्या. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि इशान किशन यांची जोडी जमली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 43 चेंडूत 70 धावांची भागीदारी केली. इशान किशन 34 धावांवर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर मैदानात आला. पण फार काळ टिकू शकला नाही. श्रेयस अय्यरचा खेळ 15 चेंडूत 12 धावा करून आटोपला. एकीकडे विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने शुबमन गिलची खेळी सुरूच होती.

अफगाणिस्तानचा डाव

अफगाणिस्तानकडून रहमनुल्लाह गुरबाज वगळता एकही फलंदाज तग धरू शकला. एकही फलंदाज 30 च्या वर धावा करू शकला नाही. रहमनुल्लाह गुरबाजने 51 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकार मारत 102 धावा केल्या. तर हशमतुल्लाह शाहिदीने 27 आणि अझमतुल्लाह ओमरजाईने 26 धावांची खेळी केली. इब्राहिम जाद्रान 1, सेदिकुल्लाह अटर 0, रहमत शाह 3, मोहम्मद नबी 9, राशीद खान 9, एएम घझनफर 0, जिया ऊर रहमान शरिफी 4 धावांवर बाद झाले.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दुसरा सामना 17 जूनला होणार आहे. हा सामना लखनौच्या एकाना स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना निर्णायक ठरू शकते. भारताने हा सामना जिंकला तर मालिका खिशात घालेल. पण अफगाणिस्तानने जिंकला तर मालिकेत 1-1 बरोबरी साधली जाईल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in