• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IMD Monsoon Update : गुड न्यूज! आता वेटिंग नाहीच, अलर्ट आलाच… कधीही दणादण कोसळणार, मान्सूनची मोठी अपडेट लगेच करा चेक

June 7, 2026 by admin Leave a Comment


वाढत्या उन्हाच्या काहिलीमुळे सगळेचजण ज्याची आतुरतेने वाट पहात आहेत अशा मान्सूनबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. देशभरात आता मान्सूनचा जोर वाढत आहे. 5 जून रोजी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर, मान्सूनने आता संपूर्ण राज्य व्यापले असून तो कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्येही पोहोचला आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सुरुवातीच्या टप्प्यात बराच सक्रिय दिसत असून, येत्या काही दिवसांत दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात कधी ?

कडाक्याच्या उन्हामुळे राज्यातील नागरिकही चांगलेच वैतागले असून पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी आतुर झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. केरळपासून गोवा आणि मुंबईपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि केरळमधील काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळू शकतो. 6 जून रोजी कोकण ते विदर्भ 25 जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. .

तर ईशान्य भारतातही पावसाचा जोर झपाट्याने वाढेल. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून लवकरच संपूर्ण ईशान्य प्रदेश व्यापेल.

7 जून नंतर…

उत्तर भारतातील सक्रिय पश्चिमी वाऱ्यांमुळे 6 जून रोजी जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याचा वाराही वाहू शकतो. मात्र, 7 जून नंतर उत्तर भारतातील पावसाची तीव्रता कमी होण्याचे संकेत आहेत.

मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये हवामान बदलणार आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि आसपासच्या परिसरातील तापमान कमी होऊ शकते. दुसरीकडे, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये सध्या तरी सर्वदूर पावसाची शक्यता कमी आहे. 6 जूनपासून बिहारच्या उत्तर आणि तराई प्रदेशात पावसाचे प्रमाण वाढू शकते, तर दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये हवामान उबदार राहू शकते.

हवामान तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, दक्षिण आणि पश्चिम भारतात मान्सूनची प्रगती अनुकूल आहे. येत्या काही दिवसांत मान्सून गोवा, उर्वरित कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्य भारतातील अधिक भागांमध्ये पुढे सरकण्याची शक्यता आहे. उत्तर भारताला मान्सूनसाठी आणखी थोडा वेळ थांबावे लागेल, परंतु मान्सूनपूर्व पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळत राहील.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashwin : तुम्ही वैभव सूर्यवंशीचा तिरस्कार कसा करु शकता? दांबुलच्या वादानंतर अश्विनच्या संतापाचा स्फोट
  • Mumbai Rains | मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण, पुढील 3 तास ऑरेंज अलर्टचा इशारा
  • 2 तास 16 मिनिटांचा सस्पेन्स चित्रपट; ‘दृश्यम 3’सारखाच तगडा क्लायमॅक्स
  • Gold Price Today : सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा उलटफेर ! आज भाव चांगलेच घसरले… जाणून घ्या दर पटापट
  • गुटखा मिळेना परप्रांतीयाचा तुकाराम मुंडे यांना शिवीगाळ, आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, पोलिसांनी थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in