• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ikka Trailer: ‘धुरंधर’मधील रेहमान डकैतपेक्षा कडक अभिनय; ‘इक्का’च्या ट्रेलरमध्ये सनी देओलवर भारी पडला अक्षय खन्ना

June 30, 2026 by admin Leave a Comment


‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाने साकारलेल्या रेहमान डकैतच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक झालं होतं. मात्र आता रेहमान डकैतलाही तोडीस तोड अशी भूमिका अक्षयने ‘इक्का’ या चित्रपटात साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘इक्का’चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. या ट्रेलरमध्ये जबरदस्त सस्पेन्स आणि ट्विस्ट पहायला मिळत आहे. यामधील अक्षयचा लूक आणि अंदाज अत्यंत दमदार आहे.

‘इक्का’ या चित्रपटाद्वारे सनी देओल ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत असून यामध्ये तो वकील अर्जुन मेहराच्या भूमिकेत आहे. याआधी सनी देओलने 33 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘दामिनी’ या चित्रपटात वकिलाची भूमिका साकारली होती. त्या चित्रपटातील कोर्टरुममधील सनी देओलचा आवाज आजही अंगावर काटा आणते. अशीच काहीशी भूमिका ‘इक्का’मध्येही पहायला मिळणार आहे.

‘इक्का’ या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात एका कोर्टरुममधील दृश्यानेच होते. सनी देओल विचारतो, “त्या रात्री काय घडलं, ते तुम्ही कोर्टाला सांगाल का?” त्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती हर्षवर्धन गौर यांचा मुलगा शौर्यमानच्या भूमिकेत अक्षय खन्ना प्रवेश करतो. त्याच्यावर एका महिलेच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. अर्जुन मेहरा एक असा वकील आहे, ज्याने आजपर्यंत एकही केस हरलेली नाही. शौर्यमान त्यालाच आपला वकील म्हणून निवडतो. त्याला त्याच्यावरील सर्व आरोप रद्द करायचे आहेत, मात्र सर्वांना शौर्यमानच खरा गुन्हेगार वाटतो.

‘इक्का’चा ट्रेलर-

अर्जुन शौर्यमानचा खटला लढायला तयार होतो, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसतो. कारण नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहणारा आणि निर्दोषांसाठी लढणारा अर्जुन यावेळी कथित आरोपीच्या बाजूने लढणार आहे. अर्जुन न्यायालयात सत्याची बाजू घेईल की शौर्यमानचा खरा चेहरा सर्वांसमोर आणेल, याची रंजक कथा ‘इक्का’मध्ये पहायला मिळणार आहे. या जबरदस्त ट्रेलरवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘रेहमान भाई परत आला आहे’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘अक्षय त्याच्या आवाजाने आणि अभिनयाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘अक्षय पुन्हा एकदा हिरोला खाऊन टाकेल’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. ‘इक्का’ या चित्रपटात सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्यासोबतच दिया मिर्झा, तिलोत्तमा शोम, संजीदा शेख आणि शिशिर शर्मा यांच्याही भूमिका आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 10 जुलै रोजी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in