• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hrithik Roshan: हृतिक रोशन डेटिंग ॲपवर शोधतोय पार्टनर, गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? प्रोफाइलमध्ये लिहिलं..

August 14, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशनच्या खासगी आयुष्याविषयी मोठी माहिती समोर येत आहे. हृतिकचं रिलेशनशिप स्टेटस पुन्हा ‘सिंगल’ झाल्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. गर्लफ्रेंड सबा आझादसोबत त्याचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे. यामागचं कारण म्हणजे ऑनलाइन फोरमवर हृतिकचा व्हायरल होणारा एक फोटो. एका डेटिंग ॲपवरील त्याचा प्रोफाइल लीक झाल्याचं समजतंय. या प्रोफाइलच्या बायोमध्ये अभिनेता, निर्माता आणि उद्योजक अशी ओळख लिहिलेली आहे. त्याचसोबत काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि कॅप घातलेला त्याचा फोटोसुद्धा त्यावर पहायला मिळतोय. हृतिकचा हा प्रोफाइल सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

या प्रोफाइलमध्ये त्याचं वय 52 असं दाखवलं जातंय. परंतु हे प्रोफाइल नवीन आहे की जुनं, याची नेमकी माहिती स्पष्ट होऊ शकली नाही. काहींनी त्याचं हे प्रोफाइल जुनं असू शकतं असा दावा केला आहे, तर काहींनी ते नवीन असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु हृतिक रोशनला डेटिंग ॲपवर पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यावर अद्याप हृतिक किंवा सबा आझादकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. बॉलिवूडचे काही सेलिब्रिटी डेटिंह ॲपवर असल्याचा खुलासा याआधीही झाला होता. अभिनेत्री उर्वशी रौतेलाने एका जुन्या मुलाखतीत हृतिक आणि आदित्य रॉय कपूर यांसारखे अभिनेते डेटिंग ॲपवर सक्रिय असल्याचा दावा केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

सुझान खानला घटस्फोट दिल्यानंतर हृतिक सबाला डेट करू लागला होता. मे 2020 मध्ये त्याने प्रेमाची जाहीर कबुलीसुद्धा दिली होती. त्यानंतर या दोघांना विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्येही एकत्र पाहिलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर हृतिकची पूर्व पत्नी सुझानसोबतही सबाचं मैत्रीपूर्ण नातं असल्याचं पहायला मिळालं होतं. सबा ही अभिनेत्री आणि गायिका आहे.

हृतिक आणि सबाच्या वयात जवळपास 17 वर्षांचं अंतर आहे. हृतिकच्या कुटुंबीयांशीही सबाची जवळीक वाढली होती. त्याच्या कुटुंबीयांसोबतचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हृतिक आणि सबाची पहिल्यांदा ओळख ही ट्विटरवर झाल्याचं म्हटलं जातं. हृतिकने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये सबा एका रॅपरसोबत दिसत होती. त्यानंतर सबाने हृतिकचे आभार मानले आणि दोघांचा संवाद सुरू झाला.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in