• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

HPV लसीकरणानंतर १६ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू, पालकांनी केला आरोप

June 25, 2026 by admin Leave a Comment


नाशिकमध्ये लसीकरणानंतर १६ वर्षीय श्रावणी पाटील या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. खुटवडनगर येथील लसीकरण शिबिरात एचपीव्ही प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही मिनिटांतच ती बेशुद्ध पडल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात लसीकरणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. दुसरीकडे, मृत्यूचे नेमके कारण फॉरेन्सिक आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

नाशिकच्या खुटवडनगर येथील लसीकरण शिबिरात १६ वर्षीय श्रावणी पाटील हिने HPV  लस घेतली होती. लस घेतल्यानंतर काही मिनिटांतच ती बेशुद्ध पडल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. तिला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. लसीकरणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रशासन सत्य लपवत असल्याचाही आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

दहा लाखात एखाद्या व्यक्तीला रिएक्शन

या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक आणि वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. चौकशीसाठी विशेष वैद्यकीय पथक नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यभर लसीकरण मोहीम राबवणाऱ्या विभागाचे वरिष्ठ अधिकारीही या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
दहा लाख लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीला लसीनंतर गंभीर रिएक्शन येऊ शकते, असा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालक कपिल आहेर यांनी सांगितले.

HPV लस नेमकी कशासाठी दिली जाते ?

HPV लस (Human Papillomavirus Vaccine) ही लस प्रामुख्याने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) आणि HPV (ह्युमन पॅपिलोमाव्हायरस) मुळे होणाऱ्या इतर कर्करोगांपासून बचावासाठी दिले जाते. HPV लसीमुळे गर्भाशयाचा कर्करोग, गुदद्वाराचा कर्करोग आणि घशाचा कर्करोग यापासून बचाव होतो.

लसीकरण मोहीम थांबवली

दरम्यान, या घटनेनंतर या संपूर्ण आरोग्य विभागात ॲक्शन मोडवर आला आहे या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत संपूर्ण लसीकरण मोहीम देखील थांबवण्यात आली आहे. त्यामुळे नेमकं आता मृत्यूचे कारण अहवालातुन काय येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : महिला जातील यशाच्या शिखरावर, आचार्य चाणक्य यांच्या 4 संदेशाकडे कधीच करू नका दुर्लक्ष!
  • फक्त 3.50 लाखांपासून किंमत! 26 किमी मायलेज देणाऱ्या देशातील ‘8’ सर्वात स्वस्त गाड्या; बघा फीचर्स
  • 9000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असलेला हा वनप्लस स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर
  • Kriti Sanon : कृती सेनला राहुल गांधींचा पाठिंबा, ट्रोल करणाऱ्यांना थेट सुनावलं, म्हणाले महिलांनी काय परिधान करावं…
  • धक्कादायक! ‘या’ तीन औषधांमुळे निर्माण होऊ शकतो कॅन्सरचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेने दिला गंभीर इशारा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in