• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hockey WC 2026: हॉकी वर्ल्डकपवर पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा दबदबा; भारताने कधी मिळवलं जेतेपद? असा आहे 55 वर्षांचा प्रवास

August 11, 2026 by admin Leave a Comment


हॉकी वर्ल्डकप स्पर्धेचा इतिहास खूपच रंजक आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या पूर्वी हा खेळासाठी ऑलिम्पिक हे मोठं व्यासपीठ होतं. पण 1971 पासून या खेळाला वर्ल्डकपचं स्वरूप प्राप्त झालं. हॉकी वर्ल्डकप स्पर्धेला 55 वर्षांहून जुना इतिहास आहे. आतापर्यंत 15 पर्व खेळली असून यंदाचं 16वं पर्व आहे. पुरूषांच्या हॉकी वर्ल्डकप स्पर्धेला 1971 मध्ये सुरूवात झाली. तर महिलांच्या वर्ल्डकप स्पर्धेला 1974 चा मुहूर्त सापडला. हॉकीला जागतिक स्तरावर ओळख मिळावी म्हणून पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे प्रमुखे मार्शन नूर यांनी वर्ल्डकप स्पर्धेची संकल्पना ठेवली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे तत्कालीन भारतीय वंशाचे अध्यक्ष रेने फ्रँक यांनी 26 ऑक्टोबर 1969 रोजी मंजुरी दिली. पुरूषांचा पहिला वर्ल्डकप 1971 मध्ये स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित करण्याता आला होता. पहिल्याच पर्वात पाकिस्तानने स्पेनला पराभूत करून जेतेपद पटकावलं होतं. महिलांच्या हॉकी वर्ल्डकप स्पर्धेला 1974 मध्ये सुरूवात झाली. ही स्पर्धा 1974 मध्ये फ्रान्सच्या मँडेल्यू येथे खेळवली गेली. या स्पर्धेत नेदरलँडने फ्रान्सला पराभूत करून जेतेपद पटकावलं होतं.

नेदरलँड आणि पाकिस्तानचा दबदबा

हॉकी वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात नेदरलँड आणि पाकिस्तानचा दबदबा पाहायला मिळाला आहे. पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत पाकिस्तानने चार वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर जर्मनी, नेदरलँड आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी तीन वेळा जेतेपद मिळवलं आहे. तर भारताने फक्त एकदाच जेतेपदाला गवसणी घातली आहे. महिला हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँडचा वरचष्मा आहे. नेदरलँडने नऊ वेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. अर्जेंटिनाने 2, ऑस्ट्रेलियाने 2 आणि जर्मनीने दोन वेळा जेतेपद पटकावलं आहे.

भारताने कधी हॉकी वर्ल्डकप जिंकला?

भारताने हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत फक्त एकदाच जेतेपदाला गवसणी घातली आहे. 1975 मध्ये मलेशियातील क्वालालंपूरमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानचा 2-1 ने धुव्वा उडवला होता. अजितपाल सिंग यांच्या नेतृत्वात भारतान हे जेतेपद मिळवलं होतं. भारतीय महिला संघाला हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद मिळवता आलेलं नाही. भारतीय महिला हॉकी संघाची सर्वोत्तम कामगिरी 1974 मध्ये झाली होती. तेव्हा भारतीय महिला संघ स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिला होता.

हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच असा बदल

हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत महिला आणि पुरूष असे वेगवेगळे सामने होत होते. पण यंदाचा वर्ल्डकप विशेष आहे. नेदरलँड आणि बेल्जियममध्ये होणारा हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत पुरूष आणि महिला दोन्ही गटांचे वर्ल्डकप एकत्र होत आहे. पुरूष वर्ल्डकप स्पर्धा पहिल्यांदा 1971 मध्ये झाली. त्यानंतर पहिल्या तीन स्पर्धा दोन वर्षांनी झाल्या. 1971 नंतर 1973 आणि 1975 ला स्पर्धा पार पडली. 1978 पासून ही स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला. महिला हॉकी वर्ल्डकप स्पर्धा पहिली स्पर्धा 1974, दोन वर्षांनी 1976, 2 वर्षांनी 1978, तीन वर्षांनी 1981, दोन वर्षांनी 1983 मध्ये झाला. त्यानंतर चार वर्षांचा नियम लागू झाला. त्यामुळे महिला हॉकी वर्ल्डकप स्पर्धेचं 16वं पर्व आहे. म



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: सुट्या तेलावर तुकाराम मुंढेंचा कडक निर्णय, अखेर मुख्यमंत्र्यांना करावा लागला हस्तक्षेप; फडणवीस म्हणाले..
  • कृती सेनॉनच्या तोकड्या कपड्यांचा वाद अखेर शमला, घेतला मोठा निर्णय
  • देशावर नवे संकट! थेट मंत्री आयसीयूमध्ये, H1N1 फ्लूची नेमकी लक्षणे काय?
  • मोठी बातमी! राज्यात घडामोडींना वेग, विरोधी पक्षाचे खासदार घेणार फडणवीसांची भेट
  • Egg Price Hike : आता खाण्याचेही वांदे… साखर, कांद्यानंतर अंड्याचे भाव वाढले, झटक्यात इतके झाले भाव?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in