• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hero आणत आहे पहिली Flex Fuel बाईक, या तारखेला होणार भारतात लाँच…

May 28, 2026 by admin Leave a Comment


देशाची सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी हीरो मोटोकॉर्प आपली पहिली फ्लेक्स फ्युअल बाईक आणत आहे. पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे एकीकडे इथेनॉल मिश्रित पेट्रोलची चर्चा सुरु असतानाच कंपनीने ३ जून रोजी आपली पहिली फ्लेक्स फ्युअल टू -व्हीलर लाँच करत आहे. या सोहळ्याला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी स्वत: उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमात पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी देखील सामील होणार आहेत.

हीरो मोटोकॉर्प अशा वेळी ही फ्लेक्स फ्युअल बाईक आणत आहे, ज्यावेळी देशभरात फ्लेक्स फ्युअलवर चर्चा झडली आहे. सरकारने अलिकडेच एक नोटिफिकेशन जारी केले होते. ज्यात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण ३० टक्क्यांवर आणण्यावर इंडस्ट्रीतून हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर देशात पेट्रोल या इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉल मिश्रित पेट्रोल ( फ्लेक्स ) वापराच्या पर्यायावर चर्चा सुरु झाली आहे.

फ्लेक्स फ्युअल व्हीईकल काय ?

फ्लेक्स फ्युअलवर चालणारी बाईक वा कार तुमच्या सामान्य गाडी सारखीच असते. यात फरक केवळ इंजिनाचा असतो. सध्या कारमधील इंजिन पेट्रोल वा डिझेलचा वापर करुन पॉवर जनरेट करतात. तर फ्लेक्स इंधनात देखील इंटनर्ल कंबस्चन इंजिन मिळते, जे पेट्रोल आणि इथेनॉलच्या ब्लेंडवर काम करु शकते.

हे इंजिन E85 फ्यूअलवर चालू शकते. ज्यात ८५ टक्के इथेनॉल आणि १५ टक्के पेट्रोल असते. सध्या भारतात E20 पेट्रोल मिळत आहे. मात्र, सरकारचे टार्गेट E100 पर्यंत चालणाऱ्या वाहनांवर पोहचण्याचा आहे. यामुळे तुमची गाडी कमी ब्लेंडवाल्या पेट्रोलवर आणि जास्त ब्लेंड वाल्या इंधनावर देखील चालू शकते.

हीरो मोटोकॉर्पची पहिली फ्लेक्स फ्यूअल बाईक

हिरोने हे सांगितले नाही की त्यांची पहिली फ्लेक्स फ्युअल मोटर सायकल कोणती असेल. रिपोर्ट्सनुसार तर कंपनी स्प्लेंडर वा एचएफ डीलक्सवर आधारित कोणत्यातरी बाईकला या विशेष इंजिनासह लाँच करु शकते.

या बाईक कंपनीच्या पोर्टफोलियोत खूप प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ब्रँड यापैकी एका बाईकचा निवड करु शकते. याशिवाय कंपनीने भारत मोबिलिटी एक्सपो २०२५ मध्ये जी फ्लेक्स फ्युअल बाईक प्रदर्शित केली होती ती देखील एचएफ डीलक्सवरच आधारित होती.

सध्या भारतात केवळ सुझुकीची जिक्सर एसएफ 250 ( Gixxer SF 250 ) हीच एकमेव बाईक आहे जी फ्लेक्स फ्युअलवर चालू शकते. ही बाईक २४९ सीसीच्या सिंगल सिलिंडर इंजिनासह येते. हीची किंमत १.९८ लाख रुपये एक्स शोरुम आहे. होंडाने देखील फ्लेक्स फ्युअल इंजिनवाल्या CB300F ला भारतात लाँच केले होते, मात्र, यानंतर तिला मार्केटमध्ये बंद केले होते.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in