• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Heart Attack पासून वाचण्यासाठी १७ व्या वर्षीच करा ही टेस्ट, कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडियाच्या शिफारशी काय?

July 8, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही वर्षांपासून कमी वयातच लोकांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहे. अनेक प्रकरणात मृत्यू देखील होत आहेत. हार्ट अटॅकची प्रकरणे वाढल्याने डॉ. देवी शेट्टी यांनी वेळीच तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. शेट्टी यांनी सांगितले की आता कार्डिओलॉजी सोसाइटी ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्वे आली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक भारतीयाने १७ व्या वयात किमान एकदा रक्ताची चाचणी करायला हवी आहे. या चाचणीने कमी वयातच शरीराचे कॉलेस्ट्रॉलची पातळी समजू शकते. यामुळे योग्य वेळेच योग्य आहार आणि जीवनशैलीवर नियंत्रण करावे लागेल.

सर्व पुरुषांनी ३५ ते ४० वयोगटातील लोकांनी नियमित हार्ट चेकअप करायला हवे. यात हार्टचे सीटी स्कॅन देखील करणे गरजेचे आहे. जर सीटी स्कॅनचे रिपोर्ट नॉर्मल आला तर पुढील सात ते १० वर्षे चिंता करण्याची गरज नाही. मात्र, रिपोर्ट नॉर्मल आले तरी सकस आहार आणि जीवनशैली चांगली राखणे गरजेचे आहे.

कुटुंबात जर हार्ट अटॅकचा इतिहास असेल तर..

ज्या कुटुंबात कमी वयातच हार्ट अटॅकचा इतिहास असेल तर त्यांनी वयाच्या तिशीची वाट न पाहाता ३० व्या वर्षी किंवा त्याच्या आधीच हार्ट चेकअप करुन घ्यायला हवे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कारण कुटुंबात जर इतिहास असेल तर अशा लोकांनी हृदय विकाराचा धोका जास्त असतो. प्रत्येक व्यक्तींनी त्याचे ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल लेव्हल आणि हार्ट हेल्थशी संबंधित आवश्यक पॅरामीटर माहिती असायला हवेत. त्यांची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. जर हे वाढलेले असतील तर उपचार सुरु करायला हवेत.

स्पोर्ट्सवाले अधिक सावधान

जर एखाद्या व्यक्तीला १७ ते १८ वयात मॅरथॉनमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर हाय इटेन्सिटी एंड्योरन्स स्पोर्ट्समध्ये भाग घ्यायला हवा, त्याच्या आधी हार्टची तपासणी करणे गरजेचे आहे. डॉ. शेट्टी यांनी सांगितले की हार्टच्या आजाराचे योग्य वेळेत निदान झाले तर त्यापासून बचाव करता येतो. या तपासणी एका तासात ही पूर्ण होऊ शकते. या चाचण्या दरवर्षी करणे फायदेशीर होऊ शकते. लोकांनी हार्टच्या चाचण्यांबाबत निष्काळजीपणा करु नयेत वेळेत या चाचण्या कराव्यात.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अस्सल गृहिणींनाच माहीत हा नुस्खा, पावसाळ्यात फ्रिजमध्ये ही वस्तू वाटीभर ठेवा; फायदे वाचून…
  • ‘ही’ 3 लक्षणे सांगतात की तुमच्या यशाच्या मार्गात कोण अडथळा आणत आहे, रहा सावध
  • Jio : जिओचे 5 सीक्रेट प्लॅन, 20 GB पर्यंत डेटा अन् OTT… सगळंच फ्री मिळणार, वाचा…
  • नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’ चित्रपटात झळकणार त्यांची पत्नी, जाणून घ्या कोण आहे गार्गी कुलकर्णी?
  • Heart Attack पासून वाचण्यासाठी १७ व्या वर्षीच करा ही टेस्ट, कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडियाच्या शिफारशी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in