• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hamza Burhan Killed : प्रिन्सिपल बनून लपला होता, दिमतीला AK-47 ने सुसज्ज गार्ड, तरीही संपला पुलवामाचा हत्यारा

May 22, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर ( PoK ) मध्ये पुलवामा अतिरेकी हल्ल्यातील एक मास्टरमाईंड म्हटला जाणाऱ्या एका अतिरेक्याचा खात्मा झाला आहे. त्याचे नाव हमजा बुरहान. या अतिरेक्याचा साल २०१९ मध्ये जम्मू-कश्मीर येथील पुलवामा हल्ल्यात महत्वाचा रोल होता. या भयंकर हल्ल्यात CRPF च्या सुमारे ४० जवान शहीद झाले होते. पाकची गुप्तहेर संघटना आयएसआयने या हमजाला एका शाळेचा प्रिन्सिपल बनवून लपवले होते. त्याच्या सुरक्षेसाठी एके- ४७ वाले गार्ड तैनात केले होते. एवढी सुरक्षा असूनही हमजा बुरहानला वाचवता आले नाही.

हमजा बुरहान याचे खरे नाव अरजुमंद गुलजार डार होते. त्याला ‘डॉक्टर’ या कोड नेमने ओळखले जात होते. तो पुलवामा जिल्ह्यातील खरबटपोरा, रत्नीपोरा येथील रहिवासी होता. त्याचे वय केवळ २७ होते. दिसायला एक सर्व सामान्य कश्मीरी जवान. मात्र, वास्तवात पाकिस्तानातून चालवल्या जाणाऱ्या खतरनाक अतिरेकी संघटना अल बद्रचा कमांडर.

कसा बनला अतिरेकी ?

पुलवामा येथून निघाला : हमजा बुरहान उर्फ अरजुमंद गुलजार डार जम्मू-कश्मीरच्या पुलवामा येथे जन्मला होता. येथेच वाढला. नंतर काही वर्षांनी पाकिस्तानात गेला.

अल बद्रशी जोडला गेला : हमजा बुरहान उर्फ अरजुमंद गुलजार डार हा पाकिस्तानात जाऊन अतिरेकी संघटना ‘अल बद्र’ मध्ये सामील झाला. या संघटनेवर भारतात बंदी घातलेली असून तिला अतिरेकी संघटना म्हणून घोषीत केले आहे.

कमांडर बनला : हमजा बुरहान हा हळूहळू अल बद्रचा कमांडर बनला होता आणि पाकिस्तानात बसून तो जम्मू-कश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले आणि इतर कारवायांना तडीस नेत होता.

ISI ने कसे लपवले ?

एका शाळेचा प्रिन्सिपल बनवून आयएसआयने हमजा बुरहान याला लपवले होते. आयएसआयने हमजाला पाक व्याप्त काश्मीर येथील एका शाळेचा मुख्याध्यापक बनवून ठेवले होते. बाहेर पाहाताना तो साधा शिक्षक वाटत होता. मात्र, या बुरख्याआड त्याने अतिरेकी कारवाया सुरु केल्या होत्या.

AK-47 वाले गार्ड तैनात

पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने त्याच्या सुरक्षेसाठी खास एके-४७ ने सुसज्ज गार्ड तैनात केले होते. यावरुन स्पष्ट होते की पाकिस्तानला तो किती महत्वाचा होता.

हमजा विरोधात कोणते गुन्हे ?

पुलवामा हल्ल्यातील सहभाग : साल २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यात या हमजा बुरहान याचा सहभाग होता. या हल्ल्यात सीआरएसएफचे ४० जवान शहीद झाले होते.

विस्फोटके जप्त : पुलवामा प्रकरणात या घटनेशी संबंधित लोकांकडे स्फोटके जप्त करण्यात आली होती.

CRPF वर ग्रेनेडने हल्ला : पुलवामामध्ये CRPF च्या जवानांवर ग्रेनेडने हल्ला करण्याच्या घटनेतही याचा सहभाग होता.

तरुणांची भरती : जम्मू-कश्मीरच्या माथी भडकलेल्या तरुणांना फूस लावून तो अल बद्र संघटनेत सामील करुन घेत होता.

मृत्यू कसा झाला ?

एवढी सुरक्षा आणि एके ४७ धारी सुरक्षा रक्षकांचा पहारा असून पाकव्याप्त कश्मीरात अज्ञात हल्लेखोरांनी हमजा बुरहान याच्यावर गोळ्या घालून त्याची हत्या केली. आतापर्यंत हे हल्लेखोर कोण होते ? हे कळलेले नाही.

कधी झाला होता पुलवामा हल्ला ?

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-कश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफ वाहनांच्या ताफ्यावर आत्मघाती अतिरेकी हल्ला झाला होता. त्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर भारताने पाकच्या बालाकोट येथे एअर स्ट्राईक करुन अतिरेकी ठिकाणांवर उत्तरादाखल कारवाई केली होती. पुलवामा हल्ला हा देशातील सर्वात मोठा नृशंस हल्ला मानला जातो.

या हल्ल्यानंतर १९८९ नंतर कश्मीरात सुरक्षा दलांवर झालेला हा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला मानला जातो. या घटनेनंतर संपूर्ण देशात शोक लहर आणि संतापाचे वातावरण होते. देशभरातून जवानांना श्रद्धांजली वाहली जात होती.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छिन्नविछिन्न अवस्थेत झुडपांमध्ये होता अभिनेत्रीचा मृतदेह, 24 तास पोत्यातच… ब्लीचिंग पावडरमुळे हत्येचं रहस्य समोर
  • अमराठी रिक्षाचालकाची मराठी रिक्षाचालकाला मारहाण, थेट मुजोरी..
  • GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
  • 8th Pay Commission: एका झटक्यात 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार, 18,000 असणारा बेसिक पगार थेट…किती वाढणार?
  • Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’, नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in