• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Guru Purnima 2026 : गुरुपौर्णिमेला गुरुंना द्या भरभरुन शुभेच्छा, पाठवा ‘हे’ खास संदेश

July 27, 2026 by admin Leave a Comment


Guru Purnima 2026 : आई – वडिलांना आयुष्याला आकार देण्यात कोणाची महत्त्वाची भूमिका असेल तर, ती गुरुंची आहे… म्हणून श्लोकात देखील सांगितलं आहे की, ‘गुरु साक्षात परब्रह्म..’, हिंदू धर्मानुसार, आषाढी पौर्णिमेला महत्त्व देण्यात आलं आहे. या पौर्णिमेलाच ‘गुरुपौर्णिमा’ म्हणतात. गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. हर्षी व्यासमुनींचा जन्म याच दिवशी झाला असे मानले जाते, त्यामुळेच याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. गुरु हे आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे दीपस्तंभ आहेत. तर आजच्या दिवशी तुमच्या गुरुंना देखील भरभरुन शुभेच्छा द्या…

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुंना देण्यासाठी निवडक शुभेच्छा…

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्ग दाखवता तुम्ही जेव्हा काय करावे काहीही समजत नाही तेव्हा आठवता तुम्ही गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

गुरू म्हणजे दीप प्रकाशाचा, अंधार दूर करणारा आशेचा मार्ग, शब्दांनी घडवतो जीवनाचा अर्थ, गुरुपौर्णिमेस मानाने वंदन. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरुविना मति नाही, गुरु विना गती नाही, गुरुविना आपले अस्तित्व नाही गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

आपल्या गुरुची मूर्ती आपल्या मनात कायम असली की आपला मार्ग कधीच चुकत नसतो गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…!

ज्ञानाची वाट दाखवणारा, संस्कारांचे बीज पेरणारा, गुरू म्हणजे जीवनाचे सार. तेच खरे ईश्वराचे रूप साकार. गुरुपौर्णिमा 2026 हार्दिक शुभेच्छा!

गुरु आपल्या जीवनाचा दिवा असतो, जो प्रत्येक अंधारातून तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
अज्ञानाचा काळोख हरवतो, ज्ञानाच्या प्रकाशाचा मार्ग दाखवतो. गुरुपौर्णिमेचा हा पावन दिवस, गुरुंना करा वंदन. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरू म्हणजे आई-वडिलांनंतरचा देव, त्यांच्यामुळे मिळतो ज्ञानाचा सागर. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरू म्हणजे वात्सल्याची छाया, शिकवतो तो जीवनाची माया. कृतज्ञतेचे शब्दच अपुरे, गुरुपौर्णिमेस वंदन त्यांना. Happy Gurupurnima 2026!
गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
दरम्यान गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरुंप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी एक सुंदर संधी असते. या दिवशी आपले आई वडील, गुरु यांचा आशीर्वाद घेऊन आपण दिवसाची सुरुवात करु शकतो.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in