• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Guru Gochar 2026: गुरूचं पुष्य नक्षत्रात महागोचर, 18 जूनपासून तीन राशींसाठी अनुकूल काळ

June 15, 2026 by admin Leave a Comment


ज्योतिषशास्त्रात देवगुरू असलेल्या बृहस्पती ग्रहाचं महत्त्व अधिक आहे. हा ग्रह सुख, सौभाग्य, धन, विवेक आणि संततीचं कारक मानला गेला आहे. त्यामुळे या ग्रहाची कुंडलीत कुठे आहे ते पाहिलं जातं. जेव्हा गुरू ग्रहाचा गोचर किंवा नक्षत्र बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येतो. त्या त्या राशीच्या जातकांना त्याचा प्रभाव दिसून येतो. सध्या गुरू ग्रह आपली उच्च रास असलेल्या कर्क राशीत गोचर करत आहे. त्यामुळे ही स्थिती ज्योतिषशास्त्रात उत्तम मानली गेली आहे. पण आता एक मोठा बदल होणार आहे. त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. पंचांगानुसार, सद्यस्थितीत गुरू ग्रह पुनर्वसु नक्षत्रात आहे. पण 18 जून 2026 रोजी रात्री 9 वाजून 32 मिनिटांनी पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

पुष्य नक्षत्र हे न्यायदेवता असलेल्या शनिदेवांच्या अधिपत्याखाली येतं. ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्र शुभ मानलं गेलं आहे. त्यामुळे गुरू ग्रह सध्या कर्क राशीत असताना शनिच्या पुष्य नक्षत्रात येणार असल्याने धनु, कर्क आणि कन्या राशीच्या जातकांना त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. 18 ऑगस्ट 2026 पर्यंत गुरू ग्रह या नक्षत्रात असणार आहे. चला जाणून घेऊयात या स्थितीचा कोणत्या राशींना लाभ मिळेल ते..

या तीन राशीचं नशिब चमकणार

धनु : या राशीच्या जातकांना गुरूच्या नक्षत्र बदलाचा लाभ मिळणार आहे. या कालावधीत करिअरशी निगडीत नवी संधी चालून येऊ शकते. नोकरी करणाऱ्या जातकांना नव्या जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना या कालावधीत नफा मिळू शकतो.

कर्क: या राशीच्या जातकांवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागू शकतात. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. आरोग्यविषयक तक्रारीतून काही अंशी दिलासा मिळणार आहे.

कन्या : या राशीच्या जातकांना नक्षत्र बदलामुळे फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं पाठबळ मिळेल. त्यामुळे गेल्या दिवसांपासून अडकलेली किचकट कामं मार्गी लागतील. या कालावधीत हातात पैसा खेळता राहिल.

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगावर मोठी अपडेट; मुंबई-पुण्यातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार?
  • अहंकारामुळे अजय देवगण-करिश्मा कपूरचा हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही, निर्मात्यांचं झालं मोठं नुकसान
  • NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
  • Narsapur case: तुला काय शिक्षा देऊ तूच सांग? कोर्ट संतापलं; नरसापूर प्रकरणात थेट आरोपीलाच विचारणा
  • ‘गरीब बापाने काय करायचं?’ निखिल चव्हाणला लग्नात सासऱ्यांनी दिली महागडी गाडी? फोटोवरून संतापले नेटकरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in