• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GT vs RR Qualifier 2 Toss: गुजरातचं खरं नाही! राजस्थानचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, वैभव सूर्यवंशी किती धावा करणार?

May 29, 2026 by admin Leave a Comment

राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवून क्वालिफायर 2 मध्ये धडक दिली आहे. आता राजस्थान रॉयल्ससमोर क्वालिफायर 2 सामन्यात 29 मे रोजी गुजरात टायटन्सचं आव्हान आहे. क्वालिफायर 2 सामन्यात जिंकणारा संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध खेळणार आहे. क्वालिफायर 2 सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. राजस्थानने टॉस जिंकला. कॅप्टन रियान पराग याने बॅटिंगचा निर्णय घेत गुजरातला बॉलिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे आता राजस्थानचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी ट्रेडमार्क सुरुवात करण्यात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

प्लेइंग ईलेव्हनचं काय?

राजस्थान रॉयल्सने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर गुजरात टायटन्सने एकमेव बदल केला आहे. गुजरातच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. आर साई किशोर याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे आर साई किशोर या संधीची किती फायदा घेतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दोन्ही संघांची 2025 पासूनची कामगिरी

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स दोन्ही संघ 2025 पासून एकमेकांविरुद्ध एकूण 4 वेळा भिडले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत.

प्लेऑफमधील दोन्ही संघांची एकमेकांविरूद्धची कामगिरी

दरम्यान गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स दोन्ही संघांची एकमेकांविरुद्ध प्लेऑफमध्ये आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. याआधी झालेल्या प्लेऑफमधील दोन्ही सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर मात केली आहे. त्यामुळे राजस्थानसमोर गुजरात विरुद्ध प्लेऑफमध्ये पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे आता या सामन्यात कोण सरस ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राजस्थान टॉसचा बॉस

🚨Toss update from New Chandigarh 🚨@rajasthanroyals won the toss and elected to bat first against @gujarat_titans

Updates ▶ https://t.co/eupS8cBPc2#TATAIPL | #Qualifier2 | #TheFinalLeap | #GTvRR pic.twitter.com/VuLXsWl9Ih

— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2026

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, प्रसीद कृष्णा आणि मोहम्मद सिराज.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कॅप्टन), डोनोवन फरेरा, दासून शनाका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा आणि यशराज पुंजा.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
  • रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक…
  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in