• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GT vs RR : वैभवचा तडाखा- फरेराचा फिनिशिंग टच, राजस्थानकडून गुजरातला 215 रन्सचं टार्गेट, फायनलचं तिकीट कुणाला?

May 29, 2026 by admin Leave a Comment

ओपनर वैभव सूर्यवंशी याची फायर खेळी आणि डोनोव्हन फरेरा याने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्ससमोर 215 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 214 धावा केल्या. राजस्थानसाठी वैभवने सर्वाधिक 96 धावा केल्या. तर डोनोव्हनने शेवटच्या ओव्हरमध्ये राशीद खान याच्या बॉलिंगवर 4 सिक्सच्या मदतीने 27 धावांची कमाई केली. डोनोव्हनने अशाप्रकारे एकूण नाबाद 38 धावा जोडल्या. तर रवींद्र जडेजा याने नाबाद 45 धावांचं योगदान दिलं. वैभव, डोनोव्हन आणि जडेजा या तिघांनी केलेल्या खेळीमुळे राजस्थानला 200 पार मजल मारता आली. त्यामुळे आता राजस्थानचे गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करणार की गुजरात फायनलचं तिकीट मिळवणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

राजस्थानची बॅटिंग

राजस्थानचा कॅप्टन रियान पराग याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी राजस्थानला झटपट 2 झटके दिले. यशस्वी जैस्वाल 1 आणि ध्रुव जुरेल 7 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि रवींद्र जडेजा या दोघांनी गेम फिरवला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 65 बॉलमध्ये 127 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र या दरम्यान रवींद्र जडेजा रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. जडेजा बाहेर गेल्यानंतर रियान पराग 11 रन्स करुन आऊट झाला. दासून शनाका याने 3 आणि जोफ्रा आर्चर याने 7 धावा जोडल्या.

रवींद्र जडेजा काही वेळानंतर मैदानात आला. जडेजाने वैभवसोबत आपली भागीदारी वाढवली. वैभव शतकाच्या उंबरठ्यावर पोहचला. मात्र वैभवचं सलग दुसऱ्यांदा शतक हुकलं. वैभव सूर्यवंशी याने 47 बॉलमध्ये 8 फोर आणि 7 सिक्सच्या मदतीने 96 रन्स केल्या.

लाईव्ह स्कोअर

फरेराचा फिनिशिंग टच

त्यानंतर जडेजा आणि फरेरा या दोघांनी सातव्या विकेटसाठी शेवटच्या 16 बॉलमध्ये नॉट आऊट 42 रन्स जोडल्या. फरेराने या दरम्यान सर्वाधिक योगदान दिलं. फरेराने राशीद खान याने टाकलेल्या 20 व्या ओव्हरमध्ये 4 सिक्सच्या मदतीने 27 धावा ठोकल्या. फरेराने 11 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 38 रन्स केल्या. तर जडेजा याने 35 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 45 रन्सचं योगदान दिलं. तर गुजरातसाठी कगिसो रबाडा आणि जेसन होल्डर या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
  • रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक…
  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in