• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Govinda: गोविंदाने सर्वांसमोर दिली प्रेमाची कबुली, तिचा हात धरला अन् सांगितलं हिचं नाव…Video Viral

August 14, 2026 by admin Leave a Comment


गोविंदा सध्या त्याची सह-अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकरसोबतच्या कथित अफेअरमुळे चर्चेत आहे. तो नुकताच कोमलसोबत मुंबई विमानतळावर दिसला होता आणि आता ते पुन्हा एकत्र दिसले आहेत. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण यावेळी गोविंदाने चक्क कोमलची ओळख माध्यमांना करुन दिली. गोविंदा आणि कोमल हे दोघेही एअरपोर्टवर स्पॉट झाले. गोविंदाने कोमल पुढे बोलवत माध्यमांसमोर आणले.

गोविंदा पापराझींशी बोलत होता. कोमल पुढे निघून जात होती पण गोविंदाने तिला अडवलं आणि म्हणाला की हिचं नाव आहे राणी स्वर्णकर…”. पुढे ते दोघे निघून गेले. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. हे पाहून गोविंदाची पत्नी, सुनीता आहुजाने, अभिनेत्यावर टीका केली. सुनीता गोविंदाबद्दल म्हणाली, “तो त्याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत फिरत आहे; त्याला लाज वाटायला हवी.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सुनीता आहुजा म्हणाली, “चित्रपट बनवायचा असतो. तो बनल्यानंतर प्रमोशन होतं. प्रमोशनशिवाय… काय अर्थ आहे? तो त्याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय; त्याला लाज वाटायला हवी. ही खूप वाईट गोष्ट आहे.” त्याचं डोकं फिरलं आहे. ” त्यानंतर सुनीता आहुजाने कोमल राणीवर टीका केली आणि तिच्या दर्जाची खिल्ली उडवली. त्या म्हणाल्या, “काहीतरी दर्जा असायला हवा. तुझा शुगर डॅडी खूप श्रीमंत आहे. नीट कपडे घाल. आमच्याकडे बघ, आम्ही किती स्टाईलमध्ये चालतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

याआधी ही दोन ते दिवसपूर्वी गोविंदा आणि कोमल स्पॉट झाले होते. मुंबई विमानतळावरील त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले होते. तेव्हाही सुनीता भडकली होती. तेव्हा ती म्हणाली होती की, “विनाशकाले विपरीत बुद्धी”. मागील काही महिन्यांपासून गोविंदा आणि कोमलच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. पण त्या खऱ्या आहेत की नाही यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. आता गोविंदा कोमल राणी सोबत एकत्र दिसल्याने आणि स्वत: राणीची ओळख करु दिल्याने या अफवा खऱ्या असल्याचे म्हटले जात आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in