• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Governor Film : मनोज बाजपेयीच्या गवर्नर चित्रपटाची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर हालत खराब

June 13, 2026 by admin Leave a Comment


Governor Opening Day Box Office : मनोज बाजपेयीने आपल्या करियरमध्ये अनेक चित्रपटात काम केलं आहे. शानदार अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकलय. बॉलिवूडमध्ये तो आधीपासूनच सक्रीय होता. पण नंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापाठोपाठ एक अनेक प्रोजेक्ट केले. चाहत्यांचा विश्वास संपादन केला. आता मनोज बाजपेयीचा नवी चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झालाय. गवर्नर या चित्रपटाचं नाव आहे. खऱ्या घटनाक्रमावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाबद्दल फॅन्सच्या मनातही उत्सुक्ता आहे. चित्रपट रिलीज झालाय. पहिल्या दिवसाच्या कमाईवर नजर मारुया. नेट कलेक्शनमध्ये हा चित्रपट पहिल्या दिवशी एक कोटी सुद्धा कमावू शकलेला नाही. या चित्रपटाचं कलेक्शन 90 लाख रुपये आहे.

सैकनिल्क रिपोर्ट्स नुसार चित्रपट ओपनिंग डे च्या दिवशी 1427 स्क्रीन्सवर रिलीज झाला. 1.08 कोटी रुपये कलेक्शन केलं आहे. या चित्रपटाबद्दल जी वातावरण निर्मिती झालेली, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये तसं चित्र दिसत नाहीय. 12 जून 2026 रोजी चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला. चित्रपटात मनोज बाजपेयीने ए रामाननचा रोल प्ले केला आहे. आरबीय गवर्नरची ही भूमिका आहे. 1990 साली भारताला आर्थिक संकटातून वाचवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

अनेक बायोपिकमध्ये काम केलं

मनोज बाजपेयीने अनेक बायोपिकमध्ये काम केलं आहे. अशा चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचा विश्वास सुद्धा जिंकला आहे. याआधी इंस्पेक्टर झेंडे फिल्ममध्ये फॅन्सचा विश्वास जिंकलेला. अलीगढ आणि सिर्फ एक बंदा काफी सारख्या चित्रपटातून बायोपिक फिल्मसमध्ये शानदार अभिनय कसा करतात ते दाखवून दिलं.

फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीजनमध्ये दमदार अभिनय

मनोजच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास त्यांचे दोन चित्रपट येणार आहेत. ते घूसखोर पंडत मध्ये दिसतील. तेच पोलीस स्टेशनमध्ये भूत सारख्या चित्रपटांचा सुद्धा भाग असतील. येणाऱ्या दिवसात फॅन्सना त्यांच्याकडून काय सरप्राइज मिळत त्याची उत्सुक्ता आहे. फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीजनमध्ये सुद्धा त्यांनी दमदार अभिनय केला होता. मनोज बाजपेयी एक सर्वगुण संपन्न अभिनेता आहे.  पहिल्या चित्रपटापासून त्याने आपला ठसा उमटवला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in