• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोनं…

July 23, 2026 by admin Leave a Comment


देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत वाढीचा कल कायम असून गुरुवार, 23 जुलै रोजीही दरांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली. मजबूत मागणी, कमी दरांवर झालेली खरेदी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी यामुळे सोन्याचे भाव पुन्हा उच्चांकाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. राजधानी दिल्लीसह मुंबई, चेन्नई, कोलकाता, पुणे आणि बेंगळुरू या प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर वाढले असून चांदीच्या किमतीतही मोठी वाढ दिसून आली आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर z1,46,570 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला असून 22 कॅरेट सोन्याची किंमत₹1,34,460 रुपये इतकी आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे आणि बेंगळुरू येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,46,520 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 1,34,310 रुपये इतकी नोंदवण्यात आली आहे.

यापूर्वीच्या व्यवहारात दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीत 1,900 रुपयांची प्रति 10 ग्रॅम इतकी वाढ झाली होती. त्यामुळे सोन्याचा भाव 1,49,600 रुपयांच्या पातळीवर पोहोचला, जो गेल्या दोन आठवड्यांतील सर्वोच्च स्तर मानला जात आहे. यावरून बाजारातील तेजीचा कल अजूनही कायम असल्याचे दिसून येते.

का वाढते आहेत सोन्याचे दर ?

तज्ज्ञांच्या मते, गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीनंतर गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी कमी दरांचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. त्याचबरोबर लग्नसराईचा हंगाम, दागिन्यांची वाढती मागणी आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत यामुळेही सोन्याच्या किमतींना आधार मिळाला आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर 4,133.39 डॉलर प्रति औंस इतका असून ऑगस्ट डिलिव्हरीसाठीच्या यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव 4,136.8 डॉलर प्रति औंस आहे. जागतिक बाजारातील या तेजीचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत आहे.

देशांतील काही प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

दिल्ली

24 कॅरेट: 1,46,570 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: 1,34,460 रुपये प्रति 10 ग्रॅम

मुंबई

24 कॅरेट: 1,46,520 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: 1,34,310 रुपये प्रति 10 ग्रॅम

कोलकाता

24 कॅरेट: 1,46,520 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: 1,34,310 रुपये प्रति 10 ग्रॅम

चेन्नई

24 कॅरेट: 1,46,520 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: 1,34,310 रुपये प्रति 10 ग्रॅम

पुणे

24 कॅरेट: 1,46,520 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: 1,34,310 रुपये प्रति 10 ग्रॅम

बंगळुरू

24 कॅरेट: 1,46,520 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: 1,34,310 रुपये प्रति 10 ग्रॅम

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 134460 146570
मुंबई 134310 146520
अहमदाबाद 134360 146570
चेन्नई 134310 146520
कोलकाता 134310 146520
हैदराबाद 134310 146520
जयपुर 134460 146570
भोपाळ 134360 146570
लखनऊ 134460 146570
चंदीगड 134460 146570

चांदीच्या किमतीतही मोठी वाढ

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही तेजी कायम आहे. 23 जुलैच्या सकाळी देशांतर्गत बाजारात चांदीचा दर 2,40,100 रुपये प्रति किलो इतका नोंदवण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव 59.78 डॉलर प्रति औंस झाला असून प्लॅटिनमची किंमत 1,646.57 डॉलर प्रति औंस इतकी आहे.

तज्ज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक घडामोडी, गुंतवणूकदारांची सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढती ओढ आणि मौल्यवान धातूंना मिळणारी वाढती मागणी यामुळे आगामी काळातही सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी आणि गुंतवणूकदारांनी बाजारातील दरांवर सातत्याने लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विवोचा Y31t 5G फोन भारतात दाखल, 7200mAh ची तगडी बॅटरी, किंमत किती ?
  • ही वस्तू महिन्यातून फक्त एकदा जाळा, साप घरातच काय पुन्हा परिसरात सुद्धा येणार नाहीत
  • Mamata Banerjee : … तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईन, ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा
  • मराठा आरक्षणासाठी अंतिम आंदोलनाची घोषणा
  • त्यांच्यासोबत….! इम्रान खान यांच्या समर्थनार्थ पॅट कमिन्स मैदानात, स्पष्टच म्हणाला की..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in