• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Purchase : आयात शुल्क वाढवलं, मोदींचं आवाहन, त्यानंतर भारतीयांच्या सोनं खरेदीत किती फरक पडला? रिपोर्ट काय सांगतो?

May 26, 2026 by admin Leave a Comment


जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात सोन्याचं एक वेगळं स्थान आहे. सोन्यासोबत भारतीयांचं एक वेगळं नातं आहे. अडचणीच्या काळात जास्त पैसा मिळवून देणारा धातू हे सोन्याचं महत्व आहेच. पण सोन्याच्या बाबतीत भारतीय खूप भावनिक असतात. 1991 साली जेव्हा देशाचं सोनं गहाण ठेवायची वेळ आलेली, तेव्हा ती गोष्ट भारतीयांच्या मनाला खूप लागलेली. नाईलाजाने सोनं विकावं लागणं ही भावना मनाला खूप लागते. म्हणून आपल्याकडे जितकं जास्त सोनं तितकी श्रीमंती बक्कळ मानली जाते. पण सध्या याच सोन्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसतो आहे. कारण सोनं खरेदीसाठी डॉलरमध्ये पैसा मोजावा लागतो. त्यात आपली परकीय गंगाजळी आटत चालली आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वर्षभर सोनं खरेदी करु नका असं आवाहन केलं.

पण त्याचा काहीही फायदा झालेला नाही. भारतीयाचं सोन्यावर असलेलं प्रेम कोणापासून लपून राहिलेलं नाही. अलीकडेच सरकारने सोनं खरेदी कमी व्हावी म्हणून सोन्यावरील आयात शुल्क दुप्पट केलं. मात्र, तरीही सर्राफा बाजार आणि ज्वेलरी शो रुममध्ये सोनं खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. फक्त वस्तूरुपी सोनचं नाही, तर लोक एक्सचेंज ट्रेडेड फंड्स आणि डिजिटल गोल्डमध्येही मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवत आहेत.

एकूण आयात शुल्क किती टक्क्याने वाढलं?

13 मे 2026 रोजी सरकारने सोन्यावरील बेसिक कस्टम ड्युटी 5 टक्क्याने वाढवून 10 टक्के केली. सोबतच एग्रीकल्चर, इंफ्रास्ट्रक्चर अँड डेवलपमेंट सेस वाढवून 1% टक्क्यावरुन 5% टक्के केला. अशा प्रकारे एकूण आयात शुल्क 15 टक्के झालं. या निर्णयाचा परिणाम असा झाला की, भारतीय रुपयात सोन्याची किंमत रेकॉर्ड स्तरावर पोहोचली. म्हणजे जे 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं आधी ₹1,47,160 रुपयांना मिळत होतं, आयात शुल्क वाढल्यानंतर ते आता 10 टक्क्याने महाग होऊन ₹1,62,120 प्रतितोळा झालं आहे. हैराण करणारी बाब म्हणजे 13 मे रोजी ज्या सोन्याची विक्री झाली, ते देशाच्या जुन्या रिझर्व्ह भंडारमधील होतं.

भारत वर्षाला किती टन सोनं आयात करतो?

भारत आपल्या एकूण गरजेपैकी 90 टक्के सोनं परदेशातून आयात करतो. देरवर्षी भारत 700 ते 800 टन सोनं आयात करतो. त्यामुळे आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये देशाच्या तिजोरीवर 72 अब्ज डॉलरचा मोठा ताण पडला. कच्चा तेलानंतर देशात सर्वाधिक आयात होणारी ही दुसरी वस्तू आहे. सोन्याच्या किंमती वाढल्या असल्या तरी लग्नाचा सीजन सुरु असल्याने भारतीयांकडून याची पर्वा न करता मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी सुरु आहे. वस्तू आणि डिजिटल अशा दोन्ही स्वरुपात रेकॉर्ड तोड सोनं खरेदी सुरु आहे.

फिजिकल गोल्ड : ग्राहकांना यासाठी वेगळं आयात शुल्क द्यावं लागत नाही. सोनार सोन्याच्या किंमतीत आयात शुल्काचा समावेश करतो. किंमती अचानक वाढल्या असल्या तरी लग्नाचा सीजन असल्याने मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी सुरु आहे.

गोल्ड ETFS : म्यूचुअल फंड्सकडून ऑफर केल्या जाणाऱ्या गोल्ड ईटीएफच्या किंमतीत हा बदल थोडा थांबून रिफ्लेक्ट होईल. म्हणून गुंतवणूकदारांनी ETFमध्ये पैसा लावला आहे.

डिजिटल गोल्ड : ई-कॉमर्स प्लेटफॉर्म्स आणि रिफायनर्सच्या माध्यमातून डिजिटल गोल्ड यूनिट्सची मोठ्या प्रमाणात शॉर्ट-टर्म खरेदी करण्यात आली.

एक्सपर्ट्सनुसार रुपयाचं अवमूल्यन आणि उच्च आयात शुल्कामुळे बाजारात अनिश्चितता जरुर वाढली आहे. पण सोनं आजही भरवशाची संपत्ती आहे.

सोनं खरेदीमध्ये बदलेला ट्रेंड काय?

सोनं महागल्याने ग्राहक आता वजनदार दागिन्यांऐवजी हलक्या वजनाचे दागिने खरेदी करत आहेत. ग्राहक बजेट वाढू नये, यासाठी कमी वजनाची ज्वेलरी खरेदी करत आहेत. खरेदी करताना हॉलमार्क आणि क्वालिटीवर लक्ष द्या असा एक्सपर्ट्सचा सल्ला आहे. लाइट वेट ज्वेलरी खरेदी करताना क्लॅस्प, प्रोंग्स आणि लिंक्स तपासून घ्या. कारण दीर्घकाळ ते दागिने टिकले पाहिजेत. त्याशिवाय आता बाजारात जुनं सोनं बदलून नवीन विकत घेण्याचा ट्रेंड सुरु आहे. जुनं सोनं बदलताना तुमच्याकडे ओरिजिनल इनवॉइस (बिल) आणि सर्टिफिकेट अनिवार्य आहे. अन्यथा मेकिंग चार्ज आणि चालू मार्केट रेट्सच्या हिशोबाने जास्त कटिंग होऊ शकते.

ज्वेलरीचे बायबॅक नियम आणि वॅल्यूएशन खूप वेगळं

लग्नाच्या सीजनमध्ये ज्वेलर्स डायमंड ज्वेलरीवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट आणि जीरो मेकिंग चार्ज सारख्या ऑफर देत आहेत. डायमंड ज्वेलरीची किंमत डिझाइन आणि क्राफ्ट्समॅनशिपमध्ये असते. त्यामुळे डिस्काऊंटची संधी मिळते. शुद्ध सोन्याचे दर डेली रेट्सशी संबंधित असतात. देशातील 280 पेक्षा अधिक जिल्ह्यात प्योर गोल्ड एक्सचेंज आणि बायबॅक सोपं आहे. पण डायमंड ज्वेलरीचे बायबॅक नियम आणि वॅल्यूएशन खूप वेगळं आहे. म्हणून ग्राहकांनी सावध असलं पाहिजे.

सोन्याच्या विक्रीतून झालेल्या प्रॉफिटवर टॅक्स कसा वाचवायचा?

जर, तुम्ही जुनं सोनं आणि ईटीएफ विकून नवीन सोनं विकत घ्यायला जात असाल तर प्रॉफिटवर लागणाऱ्या टॅक्सकडे दुर्लक्ष करु नका. सोनं विकत घेऊन एक वर्षाच्या आत विकत असाल, तर सगळं प्रॉफिट तुमच्या इनकमशी जोडून टॅक्स स्लॅब रेटच्या हिशोबाने कर लागेल. फायनान्स कायदा 2024 च्या नियमानुसार, जर फिजिकल गोल्ड विकत घेतल्यानंतर दोन वर्षाने विकत असाल, तर 12.5 टक्क्याने टॅक्स लागेल. टॅक्स एक्सपर्ट्सनुसार, जर तुम्हाला सोन्याच्या विक्रीतून झालेल्या मोठ्या प्रॉफिटवर टॅक्स वाचवायचा असेल तर कलम 54F नुसार तो पैसा तुम्ही रेजिडेंशियल प्रॉपर्टी मध्ये गुंतवू शकता. असं केल्याने लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स फ्री होईल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उन्हात उभी असलेली कार चालू करताच लगेच AC ऑन करता? सावध व्हा, नाहीतर होईल हजारो रुपयांचे नुकसान
  • वर्षभरात कितीवेळा करावी कारच्या AC ची सर्व्हिस? जाणून घ्या थंड हवेसोबत काचेवरील धुकं घालवण्याची योग्य पद्धत
  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in