• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Price Today : सराफा बाजारात उलथापालथ, सोन्याला झळाळी; चांदीच्या दरात मात्र नरमाई.. 1 तोळा सोन्याचे दर किती ?

July 28, 2026 by admin Leave a Comment


Gold Rate Today in India : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावात काहीशी घट झाल्यानंतर जागतिक कमोडिटी बाजारात हालचाली वाढल्या आहेत. वीकेंडदरम्यान दोन्ही देशांकडून एकमेकांवरील हल्ले थांबवण्यात आल्याने कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये नरमाई दिसून आली. यामुळे जागतिक स्तरावर महागाई वाढण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली असून त्याचा फायदा सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याला झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतींनीथोडी उसळी घेतली आहे. सोन्याच्या दरात मंगळवारी सकाळी, सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवण्यात आली. एका दिवसाच्या स्थिरतेनंतर सोन्याच्या किमतींनी पुन्हा तेजी पकडली आहे. राजधानी दिल्लीमध्ये गेल्या दोन दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम दरात 940 रुपयांची वाढ झाली आहे, तर 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर 860 रुपयांनी वाढल्याचे दिसून आलं. आजच्या व्यवहारात दिल्लीतीली बाजारात 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रत्येकी 10 रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, अमेरिकन डॉलरमधील कमजोरी आणि बाँड यिल्डमध्ये झालेली घट यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

देशांतर्गत बाजारात सोन्याला आधार

जागतिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहतात. पश्चिम आशियातील तणाव, आर्थिक धोरणांबाबतची अनिश्चितता आणि महागाईचे बदलते चित्र यामुळे सोन्याच्या मागणीवर परिणाम होत आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर वेगवेगळे आहेत. स्थानिक कर, मागणी आणि बाजारातील परिस्थितीनुसार या दरांमध्ये थोडाफार फरक पाहायला मिळतो.

जाणून घेऊया प्रमुख 10 शहरांमधील सोन्याच्या किमती

शहर  24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर  22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर  18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 
दिल्ली ₹1,46,050 ₹1,33,860 ₹1,09,550
मुंबई ₹1,45,870 ₹1,33,710 ₹1,09,400
कोलकाता ₹1,45,900 ₹1,33,710 ₹1,09,400
चेन्नई ₹1,45,1870 ₹1,33,710 ₹1,11,860
बंगळुरू ₹1,45,900 ₹1,33,710 ₹1,09,400
हैदराबाद ₹1,45,900 ₹1,33,710 ₹1,09,400
लखनऊ ₹1,46,050 ₹1,33,860 ₹1,09,550
पाटणा ₹1,45,950 ₹1,33,760 ₹1,09,450
जयपुर ₹1,46,050 ₹1,33,860 ₹1,09,550
अहमदाबाद ₹1,45,950 ₹1,33,760 ₹1,09,450

 

चांदीच्या दरात पुन्हा घसरण

सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात मात्र आज दबाव कायम राहिला. सलग दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. दिल्लीमध्ये एक किलो चांदीचा दर आज 100 रुपयांनी कमी होऊन 2 लाख 39 हजार 900 रुपयांवर आला आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या प्रमुख महानगरांमध्येही चांदी याच पातळीवर व्यवहार करत आहे. मात्र, याआधी चांदीच्या बाजारात मोठ्या चढ-उतारांची नोंद झाली होती. 25 जून रोजी एका किलो चांदीच्या दरात 5000 रुपयांची वाढ झाली होती, तर 24 जुलै रोजी त्याच प्रमाणात घसरण झाली होती.

चांदीचा वापर केवळ मौल्यवान धातू म्हणूनच नाही, तर उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर केला जातो. इलेक्ट्रॉनिक्स, सौर ऊर्जा आणि इतर औद्योगिक क्षेत्रांतील मागणी कमी झाल्यास चांदीच्या किमतींवर दबाव येतो. सध्या औद्योगिक मागणीतील नरमाईमुळे चांदीच्या दरात मर्यादित तेजी दिसून येत आहे.

तज्ज्ञांचं म्हणणं काय ?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमोडिटी विश्लेषक सौमिल गांधी यांच्या सांगण्यानुसार, पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. याचा फायदा सोन्याच्या बाजाराला झाला आहे. तसेच, अमेरिकन डॉलर कमकुवत होणे आणि अमेरिकन बाँड यिल्डमध्ये घट होणे हे सोन्यासाठी सकारात्मक संकेत आहेत. मात्र, भारतीय रुपया मजबूत झाल्यामुळे देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या वाढीवर काही प्रमाणात मर्यादा आली आहे.

पुढील काळात कोणत्या घटकांवर राहणार बाजाराची नजर?

जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रणव मेर यांच्या मते, आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरांची दिशा ठरवण्यासाठी अनेक जागतिक घटक महत्त्वाचे ठरणार आहेत.

बाजाराचे लक्ष प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर राहील:

– पश्चिम आशियातील भू-राजकीय परिस्थिती

– अमेरिका, युरोझोन आणि जपानमधील महागाईचे आकडे

– अमेरिकेच्या जीडीपीचे आकडे

– कन्झ्युमर कॉन्फिडन्स निर्देशांक

– साप्ताहिक बेरोजगारी अर्जांची आकडेवारी ही देखील महत्वाची ठरेल

– फेडरल रिझर्व्ह, बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपान यांच्या व्याजदरासंबंधीचे निर्णय – या घटकांवर नजर असेल.

व्याजदर, डॉलरची दिशा आणि जागतिक आर्थिक परिस्थिती यावर आगामी काळात सोन्या-चांदीच्या किमतींची हालचाल मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अवघ्या 1 लाखात घरी आणा मारुती फ्रॉन्क्स! 5 सर्वात स्वस्त व्हेरिएंट्सचे लोन, डाऊन पेमेंट आणि EMI डिटेल्स एकाच ठिकाणी
  • ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचं निधन, ‘फूल और कांटे’तून अजय देवगणला केलं लाँच
  • अचानक रशियात उतरलं अमेरिकेचं लष्करी विमान, संपूर्ण युरोपमध्ये खळबळ; नेमकं काय घडलं?
  • तीन वर्षांपासून तसंच घडतंय, रवींद्र जडेजा चुका आणि गिलला बसतोय फटका! तब्बल 22 वेळा फसला
  • FD पेक्षा जास्त परतावा, RBI ची ही योजना मालामाल करणार, हमीसह भविष्य सुरक्षित होणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in