• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Price Today : गुड न्यूज, सोने दरवाढीला अखेर ब्रेक, सराफा बाजारात मोठी घडामोड; एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातले सोन्याचे भाव

July 24, 2026 by admin Leave a Comment


वीकेंड जवळ येतानच शुक्रवारची सकाळ एक चांगली बातमी घेऊन आली आहे. देशभरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किमतींना अखेर शुक्रवार, 24 जुलै रोजी ब्रेक लागला. सकाळच्या व्यवहारात देशातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात घसरण नोंदविण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर घसरून प्रति 10 ग्रॅम 1,46,320 रुपये इतका झाला असून, 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,34,140 रुपयांवर पोहचला. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये तसेच कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,46,170 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्यासाठी 1,33,990 रुपये मोजावेलागणार आहेत.

यापूर्वीच्या दिवशी दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात 400 रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर हा दर प्रति 10 ग्रॅम 1,49,200 रुपयांवर आला. सततच्या वाढीनंतर झालेली ही घसरण बाजारासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जागतिक बाजारातही सोन्याच्या किमतींमध्ये घसरण दिसून आली आहे. स्पॉट गोल्डचा दर प्रति औंस 4,042.77 अमेरिकी डॉलर इतका झाला असून, ऑगस्ट डिलिव्हरीसाठीचा यूएस गोल्ड फ्युचर्स प्रति औंस 4,045.60 डॉलर या पातळीवर व्यवहार करत आहे.

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा वाढलेल्या भू-राजकीय तणावामुळे ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे जागतिक स्तरावर महागाईचा दबाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझर्व्ह भविष्यात व्याजदर वाढवू शकते, अशी शक्यता बाजारात वर्तवली जात आहे.

व्याजदर वाढल्यास सोन्यावर काय परिणाम होतो ?

सोनं हे व्याज न देणारं गुंतवणूक साधन आहे. जेव्हा मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवतात, तेव्हा बँक ठेवी, रोखे आणि इतर व्याज देणाऱ्या गुंतवणुकीवरील परतावा अधिक आकर्षक ठरतो. त्यामुळे काही गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक कमी करून इतर पर्यायांकडे वळतात. परिणामी, सोन्याच्या मागणीत घट होऊन त्याच्या किमतीवर दबाव येऊ शकतो.

फेडरल रिझर्व्हच्या पुढील बैठकीकडे बाजाराचे लक्ष

CME FedWatch Tool नुसार, 28–29 जुलै रोजी होणाऱ्या अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत व्याजदरात कोणताही बदल होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, बाजारातील व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यातील बैठकीत व्याजदर वाढण्याची सुमारे 81 टक्के शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्ष आता आगामी आर्थिक धोरणांकडे लागले आहे.

देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

राजाधानी दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,46,320 रुपये प्रति 1 तोळा असून 22 कॅरेटसाठी 1,34,140 रुपये मोजावे लागतली. तर आर्थिक राजधानी मुंबई आणि कोलकाता येथे 24 कॅरेटचं 1 तोळा सोनं 1,46,170 रुपयांना आणि 22 कॅरेट सोनं 1,33,990 रुपयांना आहे. मात्र चेन्नईमध्ये सोन्याचे सर्नाधिक असून 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं 1,47,290रुपयांना आणि 22 कॅरेटचं सोनं 1,35,010 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने मिळतंय. पुणे आणि बंगळुरूमधीलही सोन्याचे दर समोर आले असून 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं 1,46,170 रुपये आणि 22 कॅरेट सोनं 1,33,990 रुपयांना मिळतंय.

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे भाव (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव (₹)
दिल्ली 134140 146320
मुंबई 133990 146170
अहमदाबाद 134040 146220
चेन्नई 135010 147290
कोलकाता 133990 146170
हैदराबाद 133990 146170
जयपुर 134140 146320
भोपाल 134040 146220
लखनऊ 134140 146320
चंडीगढ़ 134140 146320

चांदीच्या किमतीतही घसरण

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही आज घसरण झाली आहे. 24 जुलै रोजी सकाळच्या सत्रात चांदीचा दर प्रति किलो 2,39,900 रुपये इतका नोंदवण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा दर प्रति औंस 57.56 डॉलर पर्यंत खाली आला आहे. त्याचबरोबर प्लॅटिनमचा दर प्रति औंस 1,592.97 डॉलर इतका आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune News : त्यांनी मारलं हो पोरीला…पुण्याच्या शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; आई-वडिलांच्या आरोपांनी एकच खळबळ!
  • कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले डोंबिवलीचे सुभेदार नेपाळपुरात बेपत्ता?, संपर्क तुटल्याने पित्याच्या शोधासाठी मुलाची धावाधाव
  • धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की… श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
  • यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
  • मोठी बातमी! पहिल्या अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद? थेट… नेमकं सत्य काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in