
अमेरिका-इराणमधला संघर्ष काही थांबताना दिसत नाहीये. एकीकड शांततेसाठी चर्चा करायची आणि दुसरीकडे एकमेकांवर हल्ले करून आगळीक करायची, असं दोन्ही देशांचं धोरण अजून कायम आहे. मात्र याचा संपूर्ण जगावर परिणा होतोय. दरम्यान सध्या भारतात सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. 29 मे रोजी सकाळी, राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम हाँ 1, 56,200 रुपयांपर्यंत घसरला. तर मुंबईत हा भाव थोडा आणखी कमी असून 10 ग्रॅमसाठी 1, 56,050 मोजावे लागत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील सध्याचा तणाव आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरची वाढती मागणी यामुळे गुंतवणूकदार सोने खरेदी करण्याबाबत सावधगिरी बाळगत आहेत. एका अहवालानुसार, अमेरिका आणि इराण यांच्यात 60 दिवसांचा करार निश्चित झाला असून, त्याला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी कधी मिळते, याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मात्र अद्याप कोणताही करार निश्चित झालेला नाही, असे इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे.
जर करार झाला नाही, तर ऊर्जा किमतींमध्ये आणखी वाढ होऊ शकते. तसेच जागतिक व्यापारात व्यत्यय येण्याची चिंता वाढेल. यामुळे दीर्घकाळ उच्च चलनवाढ होऊ शकते आणि अमेरिकेची मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्ह, आपले कठोर चलनविषयक धोरण सुरू ठेवू शकते. पण सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंसाठी हाँ एक नकारात्मक घटक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस 4,512.79 डॉलर्स इतका आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील सोन्याचे दर
| शहर | 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹) | 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹) |
| दिल्ली | 143190 | 156200 |
| मुंबई | 143040 | 156050 |
| अहमदाबाद | 143090 | 156050 |
| चेन्नई | 144990 | 158170 |
| कोलकाता | 143040 | 156050 |
| हैदराबाद | 143040 | 156050 |
| जयपुर | 143190 | 156200 |
| भोपाल | 143090 | 156050 |
| लखनऊ | 143190 | 156200 |
| चंडीगढ़ | 143190 | 156200 |
चांदीचं काय झालं ?
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही आणखी घसरण झाली आहे. 29 मे रोजी सकाळी चांदीचा भाव प्रति किलोग्राम 2,74,900 रुपये इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट चांदीचा भाव प्रति औंस ७६.१७ डॉलर्स इतका आहे. भू-राजकीय घडामोडींचा परिणाम सोने आणि इतर मौल्यवान धातूंच्या बाजारातील व्यापार वातावरणावर होत आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात भारतात चांदीच्या भावाने 4 लाखांचा टप्पा ओलांडत नवा विक्रम स्थापन केला होता.
Leave a Reply