• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : विद्यार्थ्यांना फक्त निळा किंवा काळा शाईचा पेन वापरण्याची असते मुभा, लाल का नाही? जाणून घ्या

June 21, 2026 by admin Leave a Comment


शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात तुम्ही काळ्या किंवा निळ्या शाई असलेल्या पेनने अभ्यास केला असेल. पेपर लिहिण्यासाठीही याच दोन पेनचा वापर केला असेल. आताही तुमची मुलं शाळेत शाळेत गृहपाठ, परीक्षेसाठी निळ्या किंवा काळ्या पेनाचा वापर करतात. शिक्षक या वह्या आणि पेपर तपासण्यासाठी मात्र लाल पेनाचा वापर करतात. तसेच लाल पेनाने शेरा देतात. त्यामुळे निळ्या आणि काळ्या पेनाने लिहिण्याचा सल्ला का दिला जातो? शिक्षक लाल पेन का वापरतात? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. असा काही नियम आहे का? तर असा काही नियम नाही. पण असं असूनही ही प्रथा जगभरातील अनेक देशांमध्ये पूर्वापार चालू आहे. या संदर्भात काही रिपोर्ट्स आणि तज्ज्ञांचं मत आहे. चला जाणून त्या मागचं कारण काय असू शकते ते

विद्यार्थी लिहिण्यासाठी निळी किंवा काळी शाई का वापरतात?

रिपोर्टनुसार, विद्यार्थी लिहिण्यासाठी पांढरा कागद वापरतात. या पांढऱ्या कागदावर लिहिताना निळी किंवा काळी शाई उठून दिसते. कारण हे दोन्ही रंग गडद आहेत. त्यामुळे पांढऱ्या कागदावर विरोधाभास तयार होतो. तसेच लिहिलेलं स्पष्ट दिसतं. त्यामुळे पांढऱ्या कागदावर लिहिलेला मजकूर सहज वाजता येतो. फिक्या रंगाच्या शाईने लिहिलेल्या मजकुरापेक्षा निळ्या किंवा काळ्या रंगात लिहिलेला मजकूर अधिक चांगला आणि स्पष्ट दिसतो.

काळ्या आणि निळ्या शाईत काय आहे विशेष?

निळी आणि काळी शाई लवकर फिकी पडत नाही. त्यामुळे दीर्घकाळ टीकत असल्याने वाचायला सोपं जातं. काळी शाईचा रंग दीर्घकाळ राहतो. त्यामुळे कालांतराने वाचलं तरी त्याने लिहिलेली अक्षर स्पष्ट आणि वाचनीय असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी शीर्षकं आणि महत्त्वाचे मुद्दे काळ्या रंगात लिहिली जातात. दुसरीकडे, निळ्या शाईत विशेष रंगद्रव्य असतं. त्यामुळे निळी शाईसुद्धा दीर्घकाळ टिकते. निळी शाई डोळ्यांसाठी अधिक आरामदायक असते. त्यामुळे या शाईचा वापर दीर्घ उत्तरं आणि लेखनासाठी अधिक केला जातो.

शिक्षक लाल पेन वापरण्याचं कारण काय?

शिक्षकांना गृहपाठाच्या वह्या, स्वाध्याय आणि उत्तरपत्रिका तपासाव्या लागतात. अशा स्थितीत काळ्या किंवा निळ्या पेनाचा वापर केला तर त्यांचा शेरा किंवा तपासलेलं ओळखणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे शिक्षक लाल रंगाच्या शाईचा पेन वापरतात. लाल रंग पांढऱ्या कागदावर लगेच दिसतो. त्यामुळे दुरूस्त्या, सूचना, गुण आणि शेरा सहज वाचता येतो. त्यामुळे लाल रंगाच्या शाईचा वापर केला जातो. इतकंच काय तर लाल रंग अधिकार आणि गांभीर्याचे प्रतीक मानले जातो. विद्यार्थी आणि त्यांचे पालक लाल रंगात लिहिलेल्या टिप्पण्या अधिक गांभीर्याने घेत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक
  • Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत…, हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट
  • Vaibhav Sooryavanshi: एकदा बॉलिंग पाहून बघा बॅटिंग विसराल, वैभवची नादखुळा गोलंदाजी, Video Viral
  • विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा, आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले; पाटण्यात नेमकं काय घडतंय?
  • शरीरातील या 5 लक्षणांकडे बिलकूल दुर्लक्ष करु नका, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in