
Girija Oak : निळ्या साडीतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक चांगलीच चर्चेत आली. सध्या गिरिजा ‘भारत भाग्य विधाता’ सिनेमामुळे चर्चेत आहे. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने वडिलांसोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. गिरिजा मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता गिरिश ओक यांची मुलगी आहे. गिरिश ओक आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा गिरिजा लहान असतानाच घटस्फोट झाला. त्यानंत गिरिश ओक यांनी दुसरा संसार थाटला. दरम्यान, मुलाखतीत गिरिजा हिने वडिलांसोबत आता नातं कसं आहे, याबद्दल भाष्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गिरिजा ओक हिची चर्चा सुरु आहे.
वडील गिरिश ओक यांच्याबद्दल बोलताना गिरिजा म्हणाली, ‘मी लहान असताना सर्वात मोठी फॅन बाबांची होते… त्यांची जवळपास सगळी नाटकं मी पाहिली आहे. अगदी पाठ होईपर्यंत त्यांची नाटकं मी पाहिली आहेत. त्यांच्या प्रत्येक नाटकाचे 20 – 20 प्रयोग मी पाहिले असतील. बाबांची नाटकं आणि बाबांचं काम पाहत मी मोठी झाले. पण कालांतराने माझे आई – वडील विभक्त झाले. त्यानंतर मी माझ्या आईसोबत राहू लागले. त्यामुळे बाबांसोबत माझा फारसा संपर्क आला नाही. पण एक कलाकार म्हणून माझ्या मनात त्यांच्याविषयी फार आदर आहे…’
गिरिजा पुढे म्हणाली, ‘आतापर्यंत त्यांची जे काही काम केलं आहे ते स्वकष्टाने केलं आहे. त्याबद्दल मला आदर आणि अभिमान आहे… आता आम्ही फार संपर्कात नाही. कारण मी माझ्या आईकडे राहायला लागले… त्यांचं देखील कुटुंब आहे. बायको आहे, मुलगी आहे.. सगळं उत्तम आहे. कुटुंब एकत्र आली की, भेटणं बोलणं होतं. पण असं रोजचं बोलणं होत नाही. मला माझं आयुष्य आहे. त्यांना त्यांचं आयु्ष्य आहे…’
‘आजही लोकं मला विचारतात, ‘तुम्ही गिरिश ओक यांची मुलगी ना?’ मला असं कोणी जेव्हा मला विचारतं, तेव्हा मला खूप आनंद होतो. एवढंच नाही तर, तुम्ही तुमच्या वडिलांसारखं काम करता… हे ऐकल्यानंतर तर, आणखी छान वाटतं… असं गिरिजा ओक हिने नुकताच झालेल्या मुलाखतीत सांगितलं.
Leave a Reply