• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup 2026 Final: मेस्सीसाठी अंतिम सामन्यातील पहिली 55 मिनिटं खूपच महत्त्वाची, कारण…

July 19, 2026 by admin Leave a Comment

Argentina vs Spain Final: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा मानकरी आता काही तासातच कळणार आहे. अर्जेंटीना आणि स्पेन यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यात तसं पाहीलं तर दोन्ही संघाचं पारडं जड आहे. पण गतविजेता अर्जेंटीना संघ स्पेनच्या तुलनेत उजवा आहे. या सामन्यातील पहिली 55 मिनिटं अर्जेंटीनाचा कर्णधार लियोनल मेस्सीसाठी महत्त्वाची असणार आहे. याचा थेट संबंध गोल्डन बूटच्या शर्यतीशी जोडला जात आहे. कारण तिसऱ्या क्रमांकाच्या संघासाठी झालेल्या फ्रान्स-इंग्लंड सामन्यात एम्बाप्पेने कमाल केली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात एम्बाप्पेने एक असिस्ट आणि 2 गोल मारत मेस्सीच्या पुढे निघून गेला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातील पहिली 55 मिनिटं मेस्सीसाठी महत्त्वाची असणार आहेत.

55 मिनिटात 2 गोल मारवे लागणार

फ्रान्सच्या एम्बाप्पेला गोल्डन बूटच्या शर्यतीत मागे टाकण्यासाठी मेस्सीपुढे आता तीन मार्ग आहेत. यात पहिला मार्ग म्हणजे अंतिम सामन्यातील पहिल्या 55 मिनिटांच्या खेळाशी निगडीत आहे. मेस्सीने जर पहिल्या 55 मिनिटात किंवा त्यापेक्षा कमी वेळात दोन गोल मारले तर गोल्डन बुटच्या शर्यतीत एम्बाप्पेच्या पुढे निघून जाईल.

अंतिम सामन्यात हॅट्ट्रीक मारून गोल्डन बूट मिळणार

एम्बाप्पेने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात 10 गोल मारले आहेत. तर 4 गोल असिस्ट केले आहेत. दुसरीकडे, मेस्सीच्या नावावर 8 गोल असून 4 असिस्ट केले आहे. त्यामुळे एम्बाप्पेला मागे टाकण्यासाठी मेस्सीला अंतिम सामन्यात तीन गोल मारावे लागतील. जर त्याने तसं केलं तर 11 गोल होतील आणि त्याला गोल्डन बूट मिळेल.

दोन गोल आणि 1 असिस्ट केला तरी मेस्सी सरस

तिसरा मार्ग म्हणजे अंतिम सामन्यात मेस्सीला दोन गोल मारून एक गोल असिस्ट करावा लागेल. दोन गोल मारले तर एम्बाप्पेच्या 10 गोलची बरोबरी होईल. तर एक गोल असिस्ट केल्याने एम्बाप्पेच्या पुढे निघून जाईल.

Mbappé 🇫🇷 with two goals and one assist jumps firmly to the top of the ⚽ Golden Boot rankings!

To win the Boot 🇦🇷 Messi now needs:

1⃣ a hattrick in the final OR
2⃣ two goals + one assist OR
3⃣ two goals in less than 55 mins on the pitch

To win the Golden Boot :
96% 🇫🇷 Mbappé… pic.twitter.com/HOEBbZTgJ8

— Football Meets Data (@fmeetsdata) July 18, 2026

मेस्सीला पाचवा खेळाडू बनण्याची संधी

फ्रान्सच्या एम्बाप्पेने या वर्ल्डकप स्पर्धेत 10 गोल करून एका यादीत स्थान मिळवलं आहे. अशी कामगिरी करणारा 56 वर्षातील पहिला आणि एकूण चौथा खेळाडू ठरला आहे. आता ही संधी मेस्सीकडेही आहे. अंतिम सामन्यात त्याने दोन गोल मारले तर नक्कीच मेस्सी 10 गोल मारणारा पाचवा खेळाडू ठरू शकतो. जर मेस्सीने ही संधी गमावली तर एम्बाप्पेला गोल्डन बूट मिळेल. असं झालं तर ला लीगा गोल्डन बूट, चॅम्पियन्स लीग गोल्डन बूट आणि फिफा वर्ल्डकप गोल्डन बूट जिंकणारा पहिला खेळाडू ठरेल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in